Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > पावने आठ लाख रुपयांची दारू जप्त

पावने आठ लाख रुपयांची दारू जप्त

पावने आठ लाख रुपयांची दारू जप्त
X

जप्त केलेल्या दारुसह वाहन व तीन आरोपी.

आशिष सुनतकर

उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

मो. ७०३००८१०३७

गडचिरोली/अहेरी :- जप्त केलेल्या दारुसह वाहन व तीन आरोपी. सोबत पोलीस अधिकारी.अहेरी चारचाकी वाहनात अवैधरीत्या विदेशी दारुची वाहतूक केली जात असल्याच्या माहितीवरून अहेरी पोलिसांनी सापळा रचून चारचाकी बोलेरो वाहनासह ७ लाख ७७ हजार ७०० रुपये किमतीची विदेशी दारू बुधवारी जप्त केली. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तेलंगणा राज्यातुन अवैधरित्या विदेशी दारुची वाहतूक केली जात आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अहेरी-महागाव रोडवर सापळा रचला. पोलिसांना संशयीत वाहन येत असल्याचे दिसून येताच वांगेपल्ली येथे वाहन अडवून तपासणी केली असता. यात विदेशी दारुच्या पेट्या व बोलेरो वाहन असा एकुण ७ लाख ७७ हजार७ ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणातील तीन आरोपीना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे पोलीस उपनिरीक्षक विनायक दळस पाटील , सहायक फौजदार यादव मेश्राम, पोलीस हवालदार जगन्नाथ मडावी, पोलीस शिपाई मनोज कुमरे यांनी केली.

Updated : 24 Oct 2020 12:59 PM GMT
Next Story
Share it
Top