- जिल्हा वार्षिक योजना 2021-22 च्या खर्चास जिल्हा नियोजन समितीची मान्यता
- मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील विचित्र अपघातात एक ठार
- उदयपूरला घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो
- ब्रेकिंग न्यूज-: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा...
- यवतमाळ जिल्ह्यात 245 नवीन रेशन दुकान उघडणार
- गेल्या 24 तासात 23 नवीन कोरोना पॉझिटिव्ह
- नरसी चौक ते बस स्थानक बिलोली रोड परिसरात खाजगी वाहने बेशिस्त लावत असलेल्या वाहनेचा बंदोबस्त करावे : मुस्तफा पटेल कुंचेलीकर
- घुग्घुस येथे भाजपातर्फे कुलजारचे वाटप छोट्या व्यवसायिकांची प्रगती हिच देशाची प्रगती- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
- सिरोंचा वनविभाग जगंलो से सागवान की तस्करी कर रहे तस्करों पर वनविभाग द्वारा कारवाई..
- कृषी विभाग बियाणे कंपनीच्या दावणीला

पालम तालुक्यातील शेतकरी मोठया पावसाच्या प्रतिक्षा
X
परभणी शांतीलाल शर्मा
पालम तालुक्यात यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला.याच पावसावर तालुक्यातील शेतकर्यांनी खरीपाची पेरणी केली.त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. परंतू, अद्यापही शेतकर्यांना मोठ्या पावसाची प्रतिक्षा करीत आहेत.
तालुक्यात यंदा मृग नक्षत्रात पेरणी झालि.कधी नव्हे वेळेवर पेरणी झाली.या खरीपाच्या पेरणीत शेतकर्यांनी कापसाला जास्त पसंती दिली असल्याचे दिसून येते. सततत चार वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी अस्शानी संकटाचा सामना करत आलेला आहे. यंदा तरी शेतकर्यांना चांगले दिवस येतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गात आहे. या खरीपाच्या पेरणीत सोयाबिन,कापूस, तूर, ऊडीद, ज्वारी,मूग आदी पिकांची पेरणी केली. वेळेवर पेरणी झाल्याने ऊगवण क्षमताही चांगली झाली.
अधिकच पेरणी होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. तालुक्यात अद्यापही जमि निच्या बाहेर पाणी आले नाही. अल्प पावसावरच खरीपातील पिके तरारली दिसत आहेत. सध्या जरी हा पाऊस पिकांसाठी पोषक असला तरी येणार्या काळात पिकांसाठी मोठा पाऊस होण्याची प्रतिक्षा शेतकरी करीत आहेत. सोयाबिन पिक सध्या फुलोर्यात आहे, कापसालाही फुले ऊगूवत आहेत. तर मूगाचे पिक शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे. परंतू, पाऊस कमी असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे ऊर्वरीत दोन महिन्याच्या पावसाच्या कालावधीत तरी चांगला पाऊस होऊन पिकांना पोषक ठरेल अशी आशा शेताकरी बाळगत आहेत.
नदी, नाले अद्यापही कोरडेच... तालुक्यात अद्यापही एकही मोठा पाऊस झाला नसल्याने नदी, नाले अद्यापही कोरडेच आहेत. विहीरींना अद्यापही पाणी आलेले नाही.त्यामूळे यानंतर ऊर्वरीत पावसाळ्यात तरी मोठा पाऊस होऊन आगामी काळातील पाणी टंचाई होणार नाही. त्यामुळे पिकांसह सर्वच प्रश्न मिटणार आहेत. यासाठी शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.