Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > पालममधून आठ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

पालममधून आठ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

पालममधून आठ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
X

परभणी शांतीलाल शर्मा

पालम तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दिनांक 10 सप्टेंबर रोजी रेकॉर्डब्रेक असे 8 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेषत: त्यात दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पालम तालुक्यात दिवसभरात एकूण 84 रॅपिड अँटीझन टेस्ट घेण्यात आल्या आहेत. त्यात 76 जनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. प्रामुख्याने त्यात पालम शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने 28 टेस्ट घेतल्या होत्या. त्यामध्ये चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. हे पॉझिटिव्ह रुग्ण पालम तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयातील अनुक्रमे 40 आणि ३६ वर्षाचे आहेत.अन्य दोन रुग्ण पालम शहरातील 30 आणि 35 वर्षाचे आहेत.

दुसरीकडे पालम तालुक्यातील चाटोरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आनंदवाडी येथे 15 टेस्ट घेण्यात आल्या. येथील टेस्टमध्ये 40 व 37 वर्षीय पुरुष आणि १२ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. उर्वरित टेस्ट तालुक्यातील मुत्खेड येथे घेण्यात आले आहेत. परंतु येथे 35 वर्षीय पुरुषास कोणाची लागण झाली आहे.आज आढळलेले रुग्ण तालुक्यात दुसऱ्यांदा सर्वाधिक पॉझिटिव्ह संखेमध्ये आहेत.

Updated : 10 Sep 2020 1:28 PM GMT
Next Story
Share it
Top