Home > विदर्भ > पर्सेवाडा जवळील मनमोहक धबधबा उपेक्षित

पर्सेवाडा जवळील मनमोहक धबधबा उपेक्षित

पर्सेवाडा जवळील मनमोहक धबधबा उपेक्षित
X

पर्सेवाडा जवळील मनमोहक धबधबा उपेक्षित...

▪️25 फुटावरून वाहते पाणी

▪️जाण्यात मार्ग नसल्याने अडचण

साईनाथ दुर्गम

तालुका प्रतिनिधी सिरोंचा

मो.7709049186

गडचिरोली/ सिरोंचा/पर्सेवाडा: तालुका मुख्यालयापासून 70 किलो मीटर अंतरावर असलेल्या रेणुगुंठा परिसरातील परशुबाळा गावाजवळील रेगल गावाजवळ रस्त्यावरून किमान आठशे मीटर दूर येथील 25 फूट उंच धबधबा शासण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उपेक्षितच आहे

आत्ताचा सिरोंचा तालुका ब्रिटिश काळात जिल्ह्याचा दर्जा होता या क्षेत्रात दंडकारण्य म्हणून ओळखत होती आजही हा परिसर जंगलव्याप्त आहे तालुक्यात विकास मात्र ब्रिटिश गेल्यानंतर खूटला आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून शिरूर तालुक्यात पर्शेवाडा गावाला जंगलात 25 फूट उंच असा धबधबा आहे दगडावरून पाणी पडण्याचे दृश्य बघितल्यानंतर डोळ्याचे पारणे फिरतात मात्र या धबधब्यापर्यंत जाण्याची वाट बिकट स्थितित आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये धबधबा परिसरात जाणे जीव धोक्यात घालण्यासारखे असल्याचे परिसरातील आदिवासी भांदव सांगतात. या धबधबा बाबत फारच कमी जणांना माहीत आहे असा मनमोहक धबधबा जिल्ह्यात कुठेच नसल्याचे सांगितले जाते.

या दबावाला पर्यटनाच्या दर्जा दिल्यास स्थानिकांना रोजगार प्राप्त होऊन गावात परिसराच्या विकास होऊ शकते धबधबा घनदाट जंगलात असल्याने या परिसरात राहतात त्यामुळे बरेचसे नागरिक या परिसरात भेट देण्यास कळतात वनविभागाने आरक्षित या परिसराच्या विकास होणार कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Updated : 14 Nov 2020 3:20 AM GMT
Next Story
Share it
Top