Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > परभणी जिल्ह्यतील पत्रकारांसाठी रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त बेड राखीव ठेवणार ; जिल्हाधिकारी,दिपक मुगळीकर

परभणी जिल्ह्यतील पत्रकारांसाठी रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त बेड राखीव ठेवणार ; जिल्हाधिकारी,दिपक मुगळीकर

परभणी जिल्ह्यतील पत्रकारांसाठी रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त बेड राखीव ठेवणार ; जिल्हाधिकारी,दिपक मुगळीकर
X

परभणी शांतीलाल शर्मा

जिल्ह्यतील पत्रकार कोरोना काळात जनजागृतीचे महत्वाचे काम करत आहेत. या काळात पत्रकारांना संसर्गाचा धोका घेता लक्षात जिल्ह्याततील रुग्णालयात पत्रकारांसाठी ऑक्सिजनयुक्त बेड राखीव ठेवण्यात येतील असे आश्वासन परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परभणी जिल्हा पत्रकार संघाच्या शिस्टमंडळाला दि. 9 सप्टेंबर रोजी आज सायंकाळी दिले जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकाऱयांनी मा जिल्हाधिकारी यांची भेट घेतली या वेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन दिले कोरोना काळात पत्रकार हे प्रसाशनच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत परन्तु आता पत्रकार कोरोना बाधित होत आहेत.दुर्दैवाने मागील काही काळात कोरोना बाधित पत्रकाराची मोठी हेळसांड झाली.

राज्यात 25 पत्रकार मृत्यूमुखी पडले या पत्रकारच्या कुटुंबियांना शासनाने 50 लाखाची मदत करावी तसेच पत्रकारांना 50 लाखाचे सुरक्षा विमा कवच लागू करावे,अशी मागणी निवेदनात केली तसेच जिल्ह्यतील पत्रकारांना ऑक्सिजन युक्त बेड रुग्णालयात राखीव ठेवावे अशी मागणी केली असता ती तातडीने मान्य करत जिल्ह्यात असे बेड राखीव ठेवू असे सांगितले या वेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे, कार्याध्यक्ष सूरज कदम,कैलास चव्हाण,डॉ आसाराम लोमटे,लक्ष्मण माणोलीकर,मंदार कुलकर्णी, प्रभू दिपके,विठ्ठल वडकुते,मंचक खंदारे,उत्तम बोरसुरीकर,संजय घनसावंत,मिलिंद गायकवाड, दिलीप बनकर,राहूल धबाले,अमर गालफाडे,नईम सय्यद,हरिभाऊ सुतारे, रवी मांनवतकर,उत्तम धायजे,सय्यद जमिल आदी उपस्थित होते.

Updated : 9 Sep 2020 5:35 PM GMT
Next Story
Share it
Top