परभणीत आज 14 जण कोरोनाबाधित
X
परभणी / शांतीलाल शर्मा
शहर महानगरपालिकेच्या वतीने गुरूवारी दिनांक 10 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील 6 केंद्रावर तसेच प्रभाग क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 16 येथे 153 नागरिकांची रॅपीड अॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात 139 जण निगेटीव्ह तर 14 जण बाधित आढळले.
सीटी क्लब येथे 15 जणांची तपासणी केली. 4 जण पॉझिटीव्ह सापडले.आयएमए हॉल कल्याण नगर येथे 28 जणांची तपासणी केली. तेथे 7 जण पॉझिटीव्ह सापडले.जागृती मंगल कार्यालय येथे 50 जणांची तपासणी केली. तेथे 2 पॉझिटीव्ह आढळले. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे 10 जणांची तपासणी करण्यात आली. नुतन विद्यालय 16 जणांची तपासणी केली. तेथे 1 पॉझिटीव्ह सापडले. प्रभाग क्रमांक 13 मध्ये मोबाईल टीमने 2 जणांची तपासणी केली. प्रभाग क्रमांक 14 मध्ये मोबाईल टीमने 2 जणांची तपासणी केली. प्रभाग क्रमांक 16 मध्ये 10 जणांची तपासणी केली. खासगी रुग्णालयात 20 जणांची तपासणी केली.
परभणी शहरातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले नागरिक तसेच शहरातील 50 वर्षे वय व त्यापेक्षा ज्यास्त वय असणारे नागरिक तसेच ज्या नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, किडनीचे आजार, कर्करोग व इतर आजार आहेत. अशा सर्व नागरिकांची त्यांच्या परिसरात जाऊन कोरोनाविषाणूची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात येणार आहे.सदर टेस्ट महापौर सौ.अनिताताई सोनकांबळे, आयुक्त देविदास पवार, उपमहापौर भगवानराव वाघमारे, सभागृहनेते सय्यद समी उर्फ माजू लाला, स्थायी समिती सभापती गुलमीर खान, विरोधी पक्षनेते विजय जामकर, गटनेते चांद सुभाना जाकेर खान, सौ.मंगलाताई मुद्गलकर, चंद्रकांत शिंदे व सन्माननीय सदस्य यांच्या समन्वयाने व महानगरपालिका आरोग्य विभाग प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णवाहिका आरएटी मोबाईल टीमद्वारे शहरातील सर्व प्रभागात येत आहे.तरी नागरिकांनी आपल्या परिसरात मोबाईल पथक आल्यानंतर आपल्या प्रभागाचे सदस्य यांना संपर्क करून रॅपिड अँटीजन टेस्ट करावी,असे आवाहन महापौर सौ.अनिताताई सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, आयुक्त देविदास पवार, सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजू लाला, स्थायी समितीचे सभापती गुलमीर खान यांनी केले आहे. या तपासणीसाठी मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत, सहाय्यक आयक्त श्रीकांत कांबळे, संतोष वाघमारे,शिवाजी सरनाईक, नोडल अधिकारी अभिजीत कुलकर्णी, समन्वयक गजानन जाधव, अमोल सोळंके,अमोल काटुके, सॅम्युअल आदी परिश्रम घेत आहेत.