पत्रकार म्हणजे काय ?
X
पत्रकार म्हणजे काय ?
(एक पत्रकार)
पत्रकार म्हणजे फिरता वारा ...
पत्रकार म्हणजे वाहता झरा.. पत्रकार म्हणजे रात्री एकटाच
अंधारात चमकणारा तारा ..
पत्रकार म्हणजे अंगावरिल शहारा...
पत्रकार म्हणजे रातीचा पहारा...
फक्त एक पत्रकार आहे सुख अन दुःखाचा सहारा ...
पत्रकार म्हणजे जनहिताचा नारा ...
पत्रकार आहे अनमोल हिरा...
पत्रकार म्हणजे धाक अन् दरारा...
त्याचाच आहे वचक सारा.
काहीही करू शकतो पत्रकार, जर असेल तो निती न खरा...
पत्रकारावर प्रेम करून तर पहा...
खरच एकदा तरी पत्रकारांवर प्रेम करुन पाहा..
जीवाला जीव देईल तुमच्या, त्याचा हात तर धरून पहा ...
कसा जगतो एकटा,
तुम्ही चोरून पहा..
प्रेमाने दोन शब्द, त्याच्याशी बोलून पहा..
त्याच्या सारख्या यातना एकदा तरी सोसुन पहा...
हया अनोळखी अगात तुम्ही एकटे बसून पहा...
दु:ख असून मनात
तुम्ही हसून पहा
त्याच्या सारखे तुम्ही
ऊन्हात फिरून पहा
एकदा तरी पत्रकारांवर, प्रेम करून पहा...
लेकरांसाठी झुरतो तो, तसं भेटीसाठी झुरून पहा ...
तुम्हाला काय वाटतं तुम्ही
पत्रकाराच्या यातना सासून पहा...
एकदा तरी पत्रकारांवर
तुम्ही प्रेम करून पहा ... @balubalkatet777
माझ्या सर्व पत्रकार मित्रांना समर्पित