पतीगाँव ते चिरेपली रस्त्याची दुरुस्ती करून देण्याची नागरिकांची मागणी।
X
म मराठी न्यूज नेटवर्क
विशेष तालुका प्रतिनिधी/स्वप्नील गोलेटिवार
अहेरी तालुक्यातील राजाराम खाँदला परिसरातील चिरेपली,पतीगाँव,कोत्तागुड्म,मरनेली,आदि गांवात जाण्यासाठी मुख्य मार्ग नसल्याने नागरिकांना अनेक वर्षापासून त्रास सहन करवा लागत अनेकदां शासन प्रशासनाकडे मागणी करण्यात येत आहे मात्र याकडे दुर्लक्ष केला जात आहे.
वर्ष २००५-०६ मध्ये सदर रस्ताची खड़ीकरण करण्यात आली होती मात्र दोन ते तीन मोठे नाले (नदी) आहेत त्यामुळे पावसाळ्यात सम्पर्क तूटता असतो व नागरिकांना नाहक त्रास सहन करवा लागतो.
गेल्या पाच दिवसाआधी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार हे राजाराम खाँदला परिसराच्या दौऱ्यावर आले असता पतीगाँव,चिरेपली,मरनेली व कोत्तागुड्म येतील नागरिकांनी सदर रस्ता व पूल बांधून देण्याची निवेदन देवून मागणी केली.यावेळी जि.प.अध्यक्ष यांनी सदर मार्गच्या दुरुस्ती व पूल बांधण्यासाठी मि स्वतच लक्ष घालून जिल्हा परिषदेच निधीतून निधी उपलब्ध करून देतो असे शब्द दिले आहे.
निवेदन स्वीकारताना अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,खाँदलाचे सरपंचा सौ.शंकुतला कूळमेथे,प.स.उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,जि.प.सदस्या कु.सुनीता कुसनाके उपस्थिति होते तर निवेदन देताना पतीगांव येतील प्रतिष्ठित नागरिक श्री.दुर्गा आलाम,माजी उपसरपंच श्री.भगवान मडावी,सतीश मडावी,व गावातील नागरिक उपस्थित होते.