पंचायत समितीच्या वतीने केला कोरोना योद्धाचा सन्मान...
M Marathi News Network | 22 Oct 2020 10:15 AM GMT
X
X
म-मराठी न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी/ स्नेहल चौधरी
वणी, दि. 22 : आज पंचायत समितीच्या वणी चे वतीने, कार्यरत असलेले कर्मचारी आणी सभापती यांचा कोरोनामुक्त झाल्याने त्यांच्या कोरांना काळात जीवाला उदार होऊन कोरोना संक्रमन रोखण्यासाठी जे कार्य केले, त्या कार्याची दखल पंचायत समितिच्या वतीने घेण्यात आली, या कार्यात सक्रीय असलेल्या कर्मचाऱ्याचा सन्मान करण्यात यामध्ये सभापती संजय पिंपळशेंडे, तसेच परिचारक यांचे फुलाने स्वागत करण्यात आले.
या वेळी प्रत्येक कर्मचारी हा गणवेशामध्ये दिसुन आला.पंचायत समितीचा शिस्तबध्द पणा यावेळी प्रकर्षाने दिसुन येत होता.यावेळी गटविकास अधिकारी राजेश गायनार यांनी कोरोना योद्धाचे ,शब्द सुमनाने मनोबल वाढऊन त्यांचे स्वागत केले.
Updated : 22 Oct 2020 10:15 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire