Home > विदर्भ > न्यूज १८ इंडियाचे अँकर व सीईओ विरुध्द गुन्हा दाखल करा..

न्यूज १८ इंडियाचे अँकर व सीईओ विरुध्द गुन्हा दाखल करा..

न्यूज १८ इंडियाचे अँकर व सीईओ विरुध्द गुन्हा दाखल करा..
X

अहेल ए सुनते जमातची मागणी..

जाकीर हुसैन (पुसद) न्युज १८ इंडिया या वृत्तवाहिनीचे अँकर आणि व्यवस्थापकीय संपादक अमिश देवगन यांनी टी व्ही वरील एका कार्यक्रमा दरम्यान जग प्रसिद्ध सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती अजमेर यांच्या बद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान या वक्तव्या बद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली .भारतात सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती अजमेर यांची दर्गा जगप्रसिद्ध असून देशातील लाखो भाविक त्यांना मानतात . सर्वधर्मीय श्रद्धास्थान असणाऱ्या खाजा मोईनुद्दीन चिस्ती यांच्या बद्दल न्यूज १८ इंडिया टी. व्ही च्या एका कार्यक्रमा दरम्यान अमीश देवगन नामक एका तथाकथित अँकर नी ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती चोर , लुटेरे असा उल्लेख करत त्यांचा अपमान केला .

या विधानामुळे खाजा मोईनुद्दीन चिस्ती यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या तमाम जाती-धर्म च्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यासाठी न्यूज -१८ इंडियाचे अँकर आणि सीईओ वर गुन्हा दाखल करा अशी मागणी उपविभागीय अधिकारी डॉ .व्यंकट राठोड यांच्याकडे अहेल ए सुनते जमात तर्फे करण्यात आली आहे .सदर निवेदनावर फिरोज खान, सैय्यद सिद्दीकोद्दीन , अ .रहेमान चव्हाण , मो . जिब्रान मो . अकील , मो . अतिक , हकीम चव्हाण , मो . वसीम , शे . रफीक व सय्यद नवाज अली यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

Updated : 19 Jun 2020 5:27 AM GMT
Next Story
Share it
Top