Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > नैसर्गीक आपत्तीत पिचतोय शेतकरी,शेती व्यवसाय चाललाय तोट्यात

नैसर्गीक आपत्तीत पिचतोय शेतकरी,शेती व्यवसाय चाललाय तोट्यात

नैसर्गीक आपत्तीत पिचतोय शेतकरी,शेती व्यवसाय चाललाय तोट्यात
X

कर्जमाफि, दुष्काळ, पिक विमा, दूबारा पेरणीत होळपला शेतकरी

राज्यात स्वतंत्र पिक विमा कंपनी सरसकट कर्जमाफि प्रतीक्षा

त-हाडी प्रतिनीधी

शिरपूर तालुक्यावर विविध नैसर्गीय संकटे येत असल्याने या संकटात शेतकरी होळपळत असुन सध्या शेती व्यवसाय तोट्याचा होत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत त्यामुळे प्रशासनाने या जगाच्या पोशींद्याला मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तालुक्यात दरवर्षी नैसर्गीक आपत्तीचा सामना करत असताना शेती व्यवसाय तोट्यात चालला आहे. पावसाच्या अनियमीत पणामुळे कधी दुष्काळ तर कधी ओला काळ पडत असल्यामुळे खर्चाएवढे उपन्न निघत नसल्याने कर्जाचा डोंगर दिवसें दिवस वाढतच चालला आहे. शासनाची कर्ज माफि योजना रखडल्यामुळे शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका मधुन पिक कर्ज वाटप बंद पडलेला आहे. सावकाराकडुन व्याजाने पैसे काढुन शेती करायची , तोंडाशी आलेला घास दुष्काळ, अतीवृष्टी,ओला दुष्काळामुळे हिसकावला जात असल्याने शेतकऱ्यांवर कर्जापायी आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.पिक विमा योजना नावालाच उरल्यामुळे दुष्काळात नुकसान मोठ्या प्रमाणात होवूनही पिक विम्या पासुन शेतकरी वंचीत राहत आहेत. पिक विमा कंपनीचे निकष दरवर्षी बदलत असल्याने पिक विमा मिळण्याची जिल्हयातील शेतकऱ्यांची आशा मावळताना दिसत आहे. तर दुसरीकडे विमा कंपण्या मालामाल होताना दिसत आहे. राज्य शासनाने केद्राची प्रधानमंत्री पिक विमा योजना बदलुन स्वतंत्र राज्य शासनाची बिहार, गुजरात सरकार प्रमाने राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.राज्यात गेल्या चार पाच वर्षापासुन पावसाळा कमी प्रमाणात होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी शेतीच्या पेरण्या मृग नक्षत्रात झाल्या मात्र सोयाबीन चे बियाणे न उगविल्यामुळे दुबारा पेरणीने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले तर मदतीची अपेक्षा होती मात्र सदर कंपण्या न्यायालयात गेल्याने कित्येक वर्ष मदतीची वाट पाहावी लागणार आहे. जुन, जुलै महिन्यात पावसाने राज्यात विश्रांती घेतली होती मात्र आॕगष्टच्या दुसऱ्या आठवडयापासुन पावसाळा चांगल्या प्रमाणात सुरुवात झाल्यामुळे कुठे अतिवृष्टीमुळे उभे पिके पाण्याखाली जात आहेत त्यामुळे पुन्हा हातातोंडाशी आलेला घास हिसकावल्या जात असल्यामुळे शेतकरी धास्तावलेला दिसत आहे.तर काहींच्या विहीरी खचल्याने त्यांचे मोठे आर्थीक नुकसानही झाले आहे.अशा स्थीतीत शेतकर्‍यांना ठोस मदत शासनाकडून होणे अपेक्षित असल्याची आशा लावुन हे शेतकरी बसले आहेत.

"शासनाच्या शेतीविषयी योजना पुर्णपणे रखडलेल्या आहेत. नुकसान झाल्या नंतरही पिक विम्याची रक्कम मिळत नाही. शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढुन शेती करायची शेवटी नैसर्गीक आपत्ती येवून हाती काहीच उरत नाही. हीच परिस्थीती दरवर्षी निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांजवळचे सर्व पर्याय संपलेले दिसत आहेत. त्यामुळे शासनाने कर्जमाफि, अतिवृष्टी मदत, पिक विमा यासारख्या योजना प्रभाविपणे राबविणे गरजेचे आहे.नुकसानीचा सर्व्हे वेळेत करुन तात्काळ शासकीय मदत जर मिळाली तर शेतकर्‍यांना आधार मिळेल"

शेतकर्‍यांप्रती आस्था दाखवत शेतीविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन त्या योजना शेतकर्‍यापर्यत पोहचायला हव्यात.शासकीय यंञनेनी शेतीची झालेली नूकसानभरपायीसाठी स्पाॅट पाहणी करुन मदत मिळन्यासाठी वरिष्ठाकडे वेळीच पाठपुरावा करावा.आधीच निसर्ग आपत्तीने पिचलेल्या शेतकर्‍यांना शासनाने तरी मदतीचा हात द्यावा हीच माफक अपेक्षा शेतकर्‍यांमधुन व्यक्त होत आहे.

----------------

Updated : 25 Aug 2020 7:24 AM GMT
Next Story
Share it
Top