Home > Crime news > नुरुल हसन यांची नागपूरला पाहिली कामगिरी, दाखल खुनाचा गुन्हा अवघ्या २० तासात उघडकिस आनला

नुरुल हसन यांची नागपूरला पाहिली कामगिरी, दाखल खुनाचा गुन्हा अवघ्या २० तासात उघडकिस आनला

नुरुल हसन यांची नागपूरला पाहिली कामगिरी, दाखल खुनाचा गुन्हा अवघ्या २० तासात उघडकिस आनला
X

जाकीर हुसैन विशेष प्रतिनिधी म-मराठी न्युज नेटवर्क 9421302699

नागपुर: दि. ०८.११.२०२० रोजी रात्री ०१.०० पोलिस नियंत्रण कक्ष येथुन बिनतारी संदेशाद्वारे माहिती मिळाली की इंदिरामाता नगर, हणुमान मंदिर, पो. स्टे. एम.आय.डी.सी नागपुर येथे एका इसमास मारहान झाली आहे अशा माहिती वरुन सपोनि मुसळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करता एक अनोळखी इसम वैशाली नगर इंदिरामाता नगर हनुमान मंदिरचे पुर्वेस राहणार्या रोडच्या कडेला असलेल्या सांडपाण्याचे नालीत मृत अवस्थेत पडलेला दिसला घातपातचा प्रकार दिसुन आल्याने सपोनि मुसळे यांनी वरिष्ठांना माहिती दिली घटनास्थळी पंचनामा कार्यवाही करुन रिपोर्टर नामे श्रीकांत भाऊरावजी बावने वय ४४ वर्षे रा. वैशाली नगर इंदिरामाता नगर नागपुर यांचे लेखी रिपोर्टवरुन अपराध क्रमांक ९५१/२०२० कलम ३०२ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला.

माहिती मिळताच मा. पोलिस उप आयुक्त परि-१ नुरूल हसन, नाईट राऊन्ड अधिकारी, पोलिस उपायुक्त बसवराज तेली विशेष शाखा, सहा. पोलिस आयुक्त नंदनवार गुन्हे शाखा घटनास्थळी हजर झाले घटणास्थळाची पाहणी करुन तिन टिम तयार करण्यात आल्या या तिन्ही टिमने अहोरात्र अथक परिश्रम घेतले डिसीपी ऑफिसचे पथक व पोलिस स्टेशन पथक डिबी पथक यांना संयुक्त मिळालेल्या माहितीच्या आधारे तिन्ही आरोपीताना ताब्यात घेतले.

सदर प्रकरणात मृतक अनोळखी, आरोपी अज्ञात, मारण्याचे कारण सुद्धा अज्ञात अशी परिस्थिती असतांना पो.स्टे एम.आय.डी.सी चे अधिकारी, अंमलदार व डिसीपी ऑफिसचे पथक यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप झलके (दक्षिण प्रभाग), पोलिस उपायुक्त नुरूल हसन यांचे मार्गदर्शना खाली गुप्त बातमीदार मार्फत माहिती काढुन आरोपी नामे १) शुभम उर्फ निंबु गजानन निंबुळकर वय २१ वर्ष रा. विजय नगर पक्कीडे ले-आऊट नागपुर, २) मंगेश भरत राय वय २० वर्ष रा. ३० वैशाली नगर टावरलाईन नागपुर. ३) आकाश मानिक शिंदे वय १९ वर्ष रा. रमाबाई आंबेडकर नगर जयताळा नागपुर यांना अटक केली अवघ्या २० तासात सदर गुन्हा उघडकिस आणला आहे.

Updated : 10 Nov 2020 7:52 AM GMT
Next Story
Share it
Top