Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी बसेस उपलब्ध करणार -आ. राहुल पाटील

नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी बसेस उपलब्ध करणार -आ. राहुल पाटील

नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी बसेस उपलब्ध करणार -आ. राहुल पाटील
X

परभणी शांतीलाल शर्मा

वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना जाणे येणे सोयीचे व्हावे यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली आहे.

वैद्यकीय प्रवेश नीट ची परीक्षा येत्या 13 सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर,औरंगाबाद येथील सेंटर मध्ये घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातील किमान दोन हजार विद्यार्थी परीक्षेस बसले असून त्या सर्व विद्यार्थ्यांना जाणे येण्याची व्यवस्था व्हावी यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या मुबलक प्रमाणात बसेस सोडण्यात याव्यात अशी मागणी राज्य परिवहन मंडळाकडे आमदार राहुल पाटील यांनी यांनी केली होती. या अनुषंगाने आज बुधवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी आमदार संपर्क कार्यालयात राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक मुक्तेश्वर जोशी व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी सदर परीक्षेसंदर्भात परभणी जिल्ह्यातील परभणी,गंगाखेड, जिंतूर, सेलू ,पाथरी आणि गंगाखेड आगारातून राज्य परिवहन मंडळाच्या बसेस सोडण्यात येतील,असा निर्णय घेण्यात आला.

औरंगाबाद करिता 13 सप्टेंबर रोजी त्या-त्या आगारातून सकाळी पाच वाजता, लातूर साठी सकाळी सहा वाजता, आणि नांदेड येथे जाण्यासाठी सकाळी सात वाजता विशेष बसेस उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना 12 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत आपापल्या आगारात जाण्या-येण्यासाठी चे आरक्षण करावे लागेल असे आवाहन आमदार डॉक्टर राहुल पाटील आणि विभाग नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी केले आहे. नीट परीक्षेसाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आल्याबद्दल जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी व पालकांनी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे .या बैठकीस आमदार डॉक्टर राहुल पाटील, विभाग नियंत्रक मुक्तेश्वर जोशी, सिद्धेश्वर दसपुते विभागीय वाहतूक अधिकारी, मुकुंद नगराळे यंत्र अभियंता ,दयानंद पाटील आगार प्रमुख, माजी नगरसेवक नवनीत पाचपोर, प्राध्यापक गजानन काकडे, महेश पाटील आदी उपस्थित होते.

Updated : 9 Sep 2020 5:44 PM GMT
Next Story
Share it
Top