Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > निवासी उपजिल्हाधिकरी विरूध्दच्या `ट्रॅप`चा अहवाल सादरः जिल्हाधिकारी

निवासी उपजिल्हाधिकरी विरूध्दच्या `ट्रॅप`चा अहवाल सादरः जिल्हाधिकारी

निवासी उपजिल्हाधिकरी विरूध्दच्या `ट्रॅप`चा अहवाल सादरः जिल्हाधिकारी
X

परभणी शांतीलाल शर्मा

येथील निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या विरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईचा अहवाल औरंगाबाद विभागीय महसुल आयुक्त यांच्यासह राज्य सरकारला सादर केला आहे, अशी माहिती परभणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी गुरूवारी (दि.10) बोलतांना दिली. दरम्यान, स्वाती सूर्यवंशी यांच्याविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गंगाखेड येथील एका तक्रारकर्त्याकडून विकास कामांच्या निधीस प्रशासकीय मान्यता बहाल करण्याकरिता सुमारे दीड टक्का म्हणजे साडेचार लाख रुपये लाच मागितल्या बद्दल व घेतल्याबद्दल केलेल्या कारवाईतून ताब्यात घेतले होते. अभियंता अब्दूल हकीम अब्दूल खय्यूम व अव्वल कारकून श्रीकांत करभाजन यांनाही या पथकाने रंगेहाथ पकडले.या तिघांविरूध्द परभणी येथील नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वाती सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी केलेल्या झडतीतून नऊ लाख 31 हजार रुपयांची रोकडही जप्त केली.दरम्यान स्वाती सूर्यवंशी यांना न्यायालयाने बुधवारी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Updated : 10 Sep 2020 3:39 PM GMT
Next Story
Share it
Top