Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > निकालाचे अकडे पाहून विकास कामे केली जात नाही!

निकालाचे अकडे पाहून विकास कामे केली जात नाही!

निकालाचे अकडे पाहून विकास कामे केली जात नाही!
X

"माहूर किनवट विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांची अप्रत्यक्ष टीका..."

म मराठी न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी/अमजद पठाण

वाई बाजार. :- विधानसभा निडणुकीत कोणत्या गावातून किती मतदान मिळाले याची खातरजमा न करता निवडणुकीत मतदान देणारे हे माझेच व न देणारेही माझेच, असे विधान करून निवडणूक निकालाच्या याद्या पाहून विकास कामाचे आराखडे आखत नसल्याची अप्रत्यक्ष टीका आमदार भीमराव केराम यांनी (ता.) 28 रोजी संध्याकाळी वाई बाजार ग्रामपंचायत द्वारा आयोजित सत्कार कार्यक्रमाप्रसंगी केली.

पुढे बोलताना आमदार केराम म्हणाले की, सलग पंधरा वर्ष पराभवाची मानसिकता असली तरी धैर्य आणि आत्मविश्वास सोडला नाही.

माझ्या आमदारीचा कार्यकाळ सुरू होत नाही तर लॉक डाऊन लागले त्यामुळे विकासकामांना खीळ बसली तरी देखील मला जेवढा निधी उपलब्ध झाला तो निधी गुत्तेदराच्या घशात न घालता सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने रुग्णवाहिका खरेदी केल्या,

वरिष्ठ लोकप्रतिनिधींना मागणी करून दहा व्हेंटिलेटर मिळविले एवढेच काय तर केंद्रीय एकलव्य आश्रम शाळेसाठी शंभर कोटींचा निधी येत्या वर्ष भरात आणणार असल्याचे आश्वासन आमदार भीमराव केराम यांनी दिले.

वाई बाजार ग्रामपंचायत कार्यालयत त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी गावातील प्रमुख समस्या सोडवण्यासाठी सरपंच विमल मडावी व उपसरपंच हाजी उस्मान खान यांच्या हस्ते मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

यात प्रामुख्याने हिंदू स्मशानभूमी ची संरक्षण भिंत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणे,राष्ट्रीयकृत बँकेची शाखा स्थापन करणे,गोंडखेड येथे स्मशानभूमीसाठी जागा हस्तांतरित करणे आदी मागण्यांचा समावेश होता.

यावेळी आमदार भीमराव केराम यांच्यासमवेत भाजपाचे ज्येष्ठ नेते धरमसिंग राठोड,अनिल तिरमनवार,भाजपा माहूर शहर अध्यक्ष गोपू महामुने,विष्णु पडलवार,स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमते,नीलकंठ कातले यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती.

Updated : 31 Oct 2020 2:21 AM GMT
Next Story
Share it
Top