नाभिक समाजाने दिला आंदोलनाचा इशारा
X
त-हाडी :-- दि. २२मार्च २०२० पासून लॉकडाऊन मुळे बंद असलेल्या नाभिकांचा सलून व्यवसाय ठप्प असल्याने समस्त राज्यातील सलून व्यवसायिकांची उपासमार होत आहे, अश्या परिस्थितीत सुद्धा शासनाने दिलेल्या आदेशानुसार नाभिकांनी आपला सलून व्यवसाय अगदी तंतोतंत बंद ठेवला आहे, या संदर्भात या अगोदर दि. २०एप्रिल २०२० रोजी जिल्हाधिकारी , धुळे यांचेकडे संरक्षण कीट व शासकीय मदतीची मागणी असलेले निवेदन देण्यात आले परंतु अद्यापपावेतो या संदर्भात प्रशासनाकडून कुठलेही ठोस पाउल उचलले गेले नाही, म्हणून दि. ०५ जून २०२० रोजी पुन्हा सलून व्यवसायिकास मदत व संरक्षण मिळावे याबाबत नाभिक समाजाच्या वतीने सोशल डीस्टसिंग चा वापर करत पुन:श्च स्मरणपत्र ( निवेदन ) मा. जिल्हाधिकारी साहेब धुळे .यांना देण्यात आले आहे. या निवेदनात तामिळनाडू, दिल्ली, सारख्या इतर राज्यांनी सलून व्यवसायाच्या अडचणी समजून घेऊन ज्या प्रमाणे नियमावली घालून व्यवसाय करण्याची परवानगी दिली त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा परवानगी मिळावी किंवा दरमहा १० हजार रु. मासिक अशी आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली. सलून व्यवसायिकांचा प्रश्न तातडीने न लावल्यास दि. ०८ जून २०२० पासून लोकशाहीच्या मानवी मुल्यांच्या अधिकारानुसार आम्ही कुठल्याही आंदोलनाची भूमिका घेवू, या आंदोलनामुळे काही परिणाम उद्भवल्यास सर्व तोपरी शासन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्हा अध्यक्ष भिमराव दादा वारूडे. सचिव बी.के.सुर्यवंशी. दत्तात्रय बापू सैंदाणे.महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे देवपूर विभाग प्रमुख चंद्रकांत (पप्पू)येशी,उप प्रमुख विशाल चित्ते,महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामंडळ. शहर अध्यक्ष कीशोर जाधव.महाराष्ट्र नाभिक युवक महामंडळ धुळे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र बोरसे,शहर अध्यक्ष भोला सैदाणे. मुकेश दादा चित्ते, देवपूर विभाग दुकानदार संघटनेचे सदस्य धनराज पगारे,ललीत चित्ते ,व महाराष्ट्र नाभिक महामंडळ व कर्मचारी महामंडळ राज्य कार्यकारिणी सदस्य व धुळे शहर अध्यक्ष आबासाहेब रमेश पगारे.इ.उपस्थित होते..