Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > नाचनारा कलेक्टर !

नाचनारा कलेक्टर !

नाचनारा कलेक्टर !
X

नाचनारा कलेक्टर !

म मराठी न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी/तानाजी कांबळे.

मो.8080532937

माणूस हा जन्मतः विचित्र असा प्राणी आहे.त्याच्या स्वभाव मध्ये चित्रविचित्र गुणधर्म असल्यामुळे,तो त्याच्या उर्वरित आयुष्यामध्ये अनेकवेळा वादग्रस्त ठरलेला आहे.त्यांना त्यांचे वयकक्तीत आयुष्य कसं जगावं या विषयी धार्मिक,सांस्कृतिक सामाजिक बाबतीत त्याला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलेल आहे. मात्र जर तो एखाद्या संविधानिक पदावर ती कार्यरत असेल तर मात्र त्याला,त्याचं उर्वरित आयुष्य हे संविधानाच्या चौकटीत राहूनच त्याला काढाव लागत.भारतीय संविधानाचे प्रशासकीय प्रतिनिधित्व करणाऱ्या,विविध खात्यातील सरकारी अधिकाऱ्यांना देखील हाच नियम लागू होतो.याला लातूरचे जिल्हाधिकारी,जी श्रीकांत हे,अपवाद राहिलेले नाहीत.

मूळचे कर्नाटक राज्यातील,असलेले,जी.श्रीकांत हे,

रेल्वे खात्यामध्ये नऊ वर्षे तिकीट कलेक्टर म्हणून,अर्थात तिकीट मास्तर म्हणून काम केलेले आहेत.सोबत प्रसिद्ध झालेल्या व्हायरल व्हिडिओ मध्ये,लाल रंगाचा टि-शर्ट व काळ्य रंगाची हाफ बर्मुडा पॅन्ट घालून,सौंदत्ती डोंगरावरील आईच्या गीतावरील,आई उध उध,च्या गजरात दिवसागणिक नाचणारे बेधुंद कलेक्टर जी श्रीकांत हे,सध्या त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या व्हायरल व्हिडिओ मुळे,वादग्रस्त झालेले आहेत.

या देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या 15 ऑगस्ट व प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी या दिवशी साजरा व संपन्न होणाऱ्या,भारतीय संविधानाचे उत्सवा वेळी, ते अधिक प्रमाणात डोक्यावरती संविधानाची प्रत घेऊन,आनंद उत्सव वात मग्न झाले असते तर,संविधान प्रेमींनी देशभरात केले त्यांचे स्वागत केले असते.मात्र संविधानाच्या चौकटीमध्ये प्रशासकीय सेवेतील प्रथम नागरिकाचे नेतृत्व करत असलेले,लातूरचे कलेक्टर जी श्रीकांत,त्यांच्या नाच गाण्यामुळे, लोकशाहीच्या कोणत्या स्वातंत्र्याचे गोडवे गाऊ लागले आहे याचे,गणित मांडणे सध्यातरी अवघड दिसत आहे.देशभरातल्या विविध प्रादेशिक राज्यांमध्ये कर्नाटक हे राज्य नेहमीच वादातीत व वादग्रस्त ठरलेले आहे.कर्नाटक या राज्याच्या विधिमंडळामध्ये काही आमदार,अधिवेशनाचे दरम्यान डर्टी पिक्चर चा सेक्सी व्हिडिओ बघत असताना सापडल्यामुळे त्यांचे,विधिमंडळतून निलंबन काही काळाकरता झाले होते.कर्नाटक राज्यामध्ये बहुसंख्येने असणारा,द्विभाषिक लिंगायत समाज,तेथील सत्ते मधील लोकांना,राजपाट देण्याचे काम करतो.कर्नाटक या राज्यांमध्ये लिंगायत समाज,मुस्लिम बहुभाषिक समाज,

तसेच इतर मागासवर्गीय समाजाचे अनेक लोक,कर्नाटकातून द्विभाषिक संख्येने प्रतिनिधीत्व करतात.यापैकी,महाराष्ट्रामध्ये अनेक जण हॉटेलिंग व्यवसाय,राजकारण व अन्य ट्रेडिंगच्या व्यवसायांमध्ये,तसेच भारतीय प्रशासकीय सेवेतील अनेक अधिकारी,महाराष्ट्राचे नेतृत्व करतात.

महाराष्ट्राला स्वातंत्र्यलढ्याचा खूप मोठा इतिहास आहे, या राज्याच्या अनेकांनी गाव गाड्या पासून ते शहर वस्ती उपनगरा पर्यंत आपल्या संसाराची राखरांगोळी करून, घरादारावर तुळशीपत्र ठेवून या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी,आपले योगदान दिलेले आहे.मात्र फुकटचे मिळालेल्या स्वातंत्र्याच्या गैरसमजुतीतून,अशा अनेक अवलादी,भारतीय संविधानाच्या चौकटीत आपले काम न करता,आपल्या सार्वजनिक व खासगी आयुष्याचे प्रदर्शन ठीक ठिकाणी करताना दिसून येतात.

लातूरचे कलेक्टर जी श्रीकांत यांना असा कोणता आनंद झाला होता की त्यांनी,नाचगाण्याच्या कार्यक्रमांमध्ये अतिशय

आनंदाणे आणि त्वेषाने भाग घेतला होता.त्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये सरकारकडून फुकट मिळालेल्या बंगल्याच्या परस दाराच्या बंद दरवाजा आड,कसे नाचावे हे त्यांनी ठरवावे.

हवे तर गोवा सरकारकडे प्रशासकीय बदली केंद्र सरकारकडून करून घेऊन समुद्रकिनारपट्टी वरती,बेधुंदपणे नाचावे.नाहीतरी,

गोव्याला कपडे घालून समुद्रकिनारपट्टी वरती फिरणाऱ्याना खुळ्यातच काढल जाते.

पण हा महाराष्ट्र आहे हे त्यांनी विसरू नये,महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची परंपरा आहे.लोककलेची लोकधारा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाव गाड्या पासून खूप दूरवर पोहोचलेली आहे.

न मिळालेल्या स्वातंत्र्याचा खरपूस समाचार घेणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतीया काहिली अशा प्रकारचे लोकगीत सादर करून,आपल्या भावना पोटतिडकीने सादर केल्या होत्या.

मात्र संविधानाच्या चौकटीत राहून संविधानाची पायमल्ली करणाऱ्या अशा अनेक अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेणे आता काळाची गरज आहे.अर्थातच देशभरामध्ये राजपत्रित वर्ग अधिकारी एकचे,असे अनेक अधिकारी त्यांच्या कारकीर्दीमध्ये वादग्रस्त ठरले आहेत.देश कोणत्या संकटाच्या काळात तून जात आहेत,देशातील गोरगरीब कष्टकरी तरूण व मध्यमवर्गीय मेतकूटीसआलेला आहे.उद्योग व्यवसाय ठप्प झाल्यामुळे अनेक तरुण पदवीधरांच्या नोकऱ्या,गेलेले आहेत, शेतकरी पुरता देशोधडीला लागलेला आहे. एका बाजूला सरकार चालवणारी यंत्रणा शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवत शेतमळ्याच्या रानमळा वरती डोंगरदऱ्यात फिरत आहे. प्रत्यक्षात देणार काही नसले तरी किमान सहानुभूतीच्या लाटा वाटताहेत.देशभरामध्ये निर्माण झालेल्या प्राप्त परिस्थितीमुळे अनेक जणांची आयुष्य बरबाद झालेले आहेत.

नोकरी गेल्याने व नव्याने नोकरी मिळत नसल्यामुळे अनेक तरुण वर्ग उद्विग्न अवस्थेत,हताश आवस्थेत आपल्या घरामध्ये भिंतीला टांगून राहिलेल्या,बेकारीच्या पदवीच्या पिशवी कडे एक टक नजर लावून बघत आहे.

ज्या लातूर या जिल्ह्याचे जी.श्रीकांत कलेक्टर हे प्रतिनिधित्व करतात त्या लातूर व त्या परिसरातील अनेक जिल्ह्यांमधील शेतकरी हा अतिशय,अडचणीत सापडलेला आहे.

शेतीला पुरेसे पाणी नाही,आपत्तीग्रस्त पावसामुळे अनेक पिके धोक्यात आलेली असताना,शेतमालाचे भाव केंद्र स्तरावरून पडताना,शेतकऱ्याला आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना अशा अवस्थेला समोर जावे लागत आहे.देशभरामध्ये सर्वाधिक आत्महत्या लातूर विदर्भ व मराठवाडा मध्ये होताना गेल्या अनेक वर्षापासून पूर्ण देश पाहत आहे.अनेक अस्मानी संकट यांच्यामुळे मेतकूटीस व घालमेल झालेल्या अनेक शेतकऱ्यांची तरणीबांड पोरे,गुडघ्याला बाशिंग बांधून लग्नाच्या प्रतीक्षेत घरात बसलेले आहेत.अंगभर सोन्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन करत बुलेट वरून आपला खासगी सावकारी चा ठोका वाढवणारे,महाराष्ट्रातील अनेक खाजगी सावकार,अनेक श्रीमंत, धनिक,आपल्या आपल्या मस्तीत जगत आहेत.सामाजिक अस्वस्थतता ही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत.अशा बिकट काळाच्या परिस्थितीमध्ये नाचगाण्यात धुंद व मग्न होणाऱ्या,या लातूरच्या कलेक्टर साहेबांना महाराष्ट्र भुषण पुरस्काराने राज्य सरकारने सन्मानित केले पाहिजे.

या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व बाभूळ गावच्या सरपंच पदापासून ते महाराष्ट्राचे अनेक वेळा मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलेले स्वर्गीय, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख हे देखील,महाराष्ट्रातील कलाकारी विषयी हौशी होते.सध्या त्यांचे सुपुत्र हे,प्रसिद्ध सिने अभिनेते आहेत.कदाचित त्यांचा वाण नाही पण गुण कलेक्टर जी श्रीकांत यांना लागलेला दिसून येत आहे.

महाराष्ट्राच्या मंत्रालयातील व सचिवालयातील वर्ग-1 चे,

अनेक सरकारी बाबू,राजपत्रित अधिकारी,प्रतिवर्षी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सायंकाळच्या वेळी, दारूच्या ओल्या पार्ट्या झोडपता ना दिसतात.पडद्या पाठीमागे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील गुलाबी थंडी,आणखीन कशाकशाने घालवत असतील हे फक्त विधिमंडळाच्या ज्येष्ठ पत्रकारांनाच ठाऊक असेल.राजपत्रित अधिकारी वर्गांमध्ये जिल्हादंडाधिकारी या नात्याने कलेक्टर या अतिमहत्त्वाच्या प्रथम नागरिकत्वाच्या पदाला,विशेष आणि खास महत्त्व आहे. जिल्हादंडाधिकारी या नात्याने त्यांना जिल्ह्याचे पालकत्व संविधानाच्या चौकटीत राहून बहाल केलेली असते.

कलम 188 च्या संचार बंदीच्या काळात पोलिसाच्या बंदुकीतून निघणाऱ्या गोळी वरती परवानगीची सही तेथील जिल्हा दंडाधिकारी यांनी केलेली असते.जिल्हादंडाधिकारी सारख्या अतिशय महत्वाच्या कायद्याच्या चौकटीत राहून काम करणाऱ्या पदाला, चिल्लर नाचगाण्याचे ग्रहण लागत असेल तर नक्कीच ही बाब महाराष्ट्राच्या राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राला काळिमा फासणारी ठरणारी आहे...

Updated : 28 Oct 2020 1:58 AM GMT
Next Story
Share it
Top