Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > नागरिक झाले बिनधास्त;शासकीय यंत्रणाही दमली "मास्क"ही गायब

नागरिक झाले बिनधास्त;शासकीय यंत्रणाही दमली "मास्क"ही गायब

नागरिक झाले बिनधास्त;शासकीय यंत्रणाही दमली मास्कही गायब
X

कोरोनाला शहर वासीयांकडून उघड आमंत्रण

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

चांदूर रेल्वे -: लॉकडाउन नंतर झालेल्या "अनलॉक वन" च्या घोषणेनंतर चांदूर रेल्वे शहरातील नागरिक बिनधास्त झाले असून, कोरोनाची भीती आणि तोंडावरील मास्क लावण्याची सवय दूर पळाल्याचे पहायला मिळत आहे. डिस्टन्सिंग व इतर नियमांचे तर सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे. सुरुवातीला दंड आकारणारी शासकीय यंत्रणा पुरती दमलेली दिसून येत आहे.

शहरातील सर्व दुकाने सुरू झाली असून, परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. शहरातील सर्व शासकीय व इतर कार्यालये सुरू झाल्याने अमरावती व इतर शहरांतून अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. दिवसें-दिवस सर्वांचीच आर्थिक परिस्थिती ढासळत असताना त्याला सावरण्यासाठी शासनाने सर्व व्यवसाय व प्रतिष्ठाने उघडण्याची परवानगी दिली,पण काही निर्बंध कायम आहेत. हे निर्बंध झुगारून कोरोना पूर्णत: गेल्याचा अविभार्वात तालुक्यातील व शहरातील लोक वावरत आहेत. शहरात कामानिमित्त व सहज फिरणाऱ्या नागरिकांमध्ये अर्ध्याधिक नागरिकांनी मास्कला दूर सारले आहे.

सुरुवातीला नगर परिषद, तहसील, पोलीस प्रशासन गैर जबाबदार नागरिकांना चौकांत अडवून दंड ठोठावत असल्याचे वृत्त येत असे. आता त्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत असून, त्या ठिकाणी ना तोंडाला मास्क असते, ना योग्य अंतर राखले जाते. हा प्रकार कोरोनाला आमंत्रण असल्याचे स्पष्ट आहे.

नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आकस्मिक पद्धतीने पोलीस विभाग व नगर परिषदेकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच नगर परिषद कडून मास्क, सोशल डिस्टन्सिंग याबाबत कार्यवाही केली जाते. दोन महिन्यांपासून जी कार्यवाही नगर परिषदेने केली, त्याचा उद्देश नागरिकांना शिस्त लावणे, व कोरोनापासून त्यांचे संरक्षण करणे हा होता. नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत: घ्यायची आहे आणि शहराला कोरोना संसर्गापासून दूर ठेवायचे आहे..

मेघना वासनकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, चांदूर रेल्वे

Updated : 21 Jun 2020 5:46 AM GMT
Next Story
Share it
Top