Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > नागपंचमी विशेष.

नागपंचमी विशेष.

नागपंचमी विशेष.
X

सततचा दुष्काळ उजाड व ओसाड होणारी माळराने यामुळे नागाचे अस्तित्व धोक्यात.

शेतकऱ्यांचे मित्र संबोधल्या जाणाऱ्या नागाचे आगामी काळात प्रशासनाला करावा लागणार संरक्षण.

त-हाडी (प्रतिनिधी)

महेंद्र खोंडे

नाग हा शेतकर्‍यांचा मित्र समजला जातो व सुहासने चा भाऊ मानला जातो यामुळे वर्षातून श्रावण मासाच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुवासिनीच्या या लाडक्या भाऊराया ची नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो परंतु सध्या या स्थितीत सतत पडणारा दुष्काळ बेसुमार वृक्षतोड व उजाड ओसाड पडणाऱ्या माळराना मुळे या नागाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

बेसुमार जंगलतोड, वाढलेला मानवी हस्तक्षेप, पुरेशा संरक्षणाचा अभाव, अपुरी यंत्रणा आणि कालबाह्य व्यवस्थापन यामुळे वन्यजीवांच्या व सापाच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, तर काही वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे धक्कादायक निरीक्षण वन विभागाने नोंदविले आहे.साप म्हटल्यावर शहरी माणसाच्या अंगावर भीतीने काटा येतो, तर ग्रामीण भागात त्याला एकतर देवत्व देऊन अंधश्रद्धा निर्माण झालेल्या असतात किंवा थेट जिवाच्या भीतीने त्याला मारून टाकलं जातं. आपल्याकडची सापांबद्दलची एकंदरीत भावना ही अशी आहे.

आपण शाळेत शिकतो की साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. तो पिकाची नासाडी करणारे उंदीर मारून खातो पण तरीदेखील गावाकडच्या घरी साप दिसल्यावर त्याला मारण्याकडेच आपला कल असतो. उगाच पोराबाळांना त्रास नको म्हणून. गेल्या काही वर्षांत याबाबतीत बरीच जागरूकता झाली आहे. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांनी आणि सर्पमित्रांच्या माध्यमातून सापांबद्दलची भीती बऱ्यापैकी कमी होत आहे, पण तरीदेखील सापाबद्दलचं आपलं ज्ञान अगाधच म्हणावं लागेल. मागील काही वर्षापासून सतत पडणारा दुष्काळ आणि ओसाड उजाड पडलेली माळराने या सर्पाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारी ठरत आहेत. शेतकऱ्यांचा मित्र असलेला साप असाच दुर्मिळ होत राहिला तर आगामी काळात याच्या संवर्धनाचे सर्वस्वी जिम्मेदारी प्रशासनाला घ्यावे लागणार हे नक्की.

Updated : 24 July 2020 6:52 PM GMT
Next Story
Share it
Top