ध्यान साधनेतून मानसिक तणाव दुर करता येतो
X
मंगरुळपीर-(फुलचंद भगत)लॉकडाउनच्या वाढत्या काळात घरातच राहिल्यामुळे अनेकांना मानसिक तणाव दुर करायचा आहे . हा मानसिक तणाव तुम्हाला दूर करायचा असेल तर तुम्ही ‘ध्यानसाधना’ करायला हवी. मेडिटेशन हा एक उत्तम मार्ग आहे. तुम्हाला सध्या या काळात सशक्त बनवू शकतो. ध्यान करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरीच ध्यान साधना करु शकता. म्हणूनच आज पासुन आपण रोज कमीत कमी पाच ते दहा मिनिट ध्यान साधना/मेडिटेशन करूया.रोजच्या आयुष्यात जर आपण ध्यानाला जागा दिली तर आत्म्याचा विकास होते, व हळूहळू विकसित आणि शुद्ध चेतना म्हणजे काय याचा अनुभव होतो.
जेव्हा आत्मा विकसीत आणि विशाल होते त्यावेळी आयुष्यातील क्षोभ अगदी नगण्य होऊन जातो. राग आणि निराशा ह्या भावना क्षणिक होऊन जातात. तुम्ही वर्तमानात जगायला सुरुवात करता आणि भूतकाळातल्या गोष्टींना "झालं ते गेलं" च्या नजरेने पाहता. ध्यानाचे फायदे कसे घ्यावेत ध्यानाचे फायदे अनुभवण्यासाठी नियमित सराव करत राहणे जरुरी आहे, आणि तो पण फक्त रोजची काही मिनिटे. एकदा का ते तुमच्या रोजच्या व्यवहातर समाविष्ट झाले की ध्यान हे तुमच्या दिवसाचा सर्वोत्तम भाग बनून जाईल. ध्यान हे एका बीजा प्रमाणे आहे. ते जेव्हा प्रेमाने पेरले जाते ते अधिकाधिक फुलते. त्याचप्रमाणे आत्मा विकासाच्या रोपट्याचं खतपाणी म्हणजे ध्यान.
ध्यानासाठी सूचना पहिल्यांदा ध्यान करणारे या सोप्या सोप्या सूचनांचे पालन करूया
सोयीची आणि ठराविक वेळ आणि जागा नक्की करा.
ध्यान करण्यापूर्वी पोट हलके राहू द्या. पोट खूप भरलेले असेल तर ध्यान करू नका.
हलका फुलका व्यायाम आणि दीर्घ श्वासांनी सुरवात करा.
ध्यान करतेवेळी चेहऱ्यावर सुंदर स्मित हास्य नक्की असू.
फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
9763007835