Home > विदर्भ > धोबी समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करा

धोबी समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करा

धोबी समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करा
X

राळेगाव तालुका प्रतिनिधी :---

धोबी समाजाला अनुसूचित जाती प्रवर्ग समावेश करण्यात यावा यासाठी राळेगाव धोबी समाज संघटनेच्यावतीने ४ सप्टेंबर २०२० ला तहसील कार्यालय समोर काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली तसेच याबाबत निवेदन तहसीलदाराना देण्यात आले. धोबी समाज संपूर्ण देशात राहणीमानाने आणि आणि व्यवसायाने एकच आहेत देशातील १७ राज्यांमध्ये धोबी समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश आहे तर उर्वरित राज्यात नाही एका देशात समाजाचे दोन प्रवर्गात विभाजन झाले आहे त्यामुळे सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात या समाजाचे शोषण झाले आहे तसेच भाषावार प्रांत रचनेपूर्वी भंडारा बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश मध्यप्रदेश राज्यात समावेश होता परंतु त्यावेळी धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळत होत्या परंतु १९६० ला राज्याची निर्मिती झाली तेव्हा मात्र दोन्ही जिल्ह्यात धोबी समाजाला इतर मागास प्रवर्गामध्ये समाविष्ट केल्यामुळे या समाजाला मिळणाऱ्या अनुसूचित जातीच्या सवलती बंद झाल्या दहा महिन्याचा कालावधी झाल्यानंतर सुद्धा राज्य शासनाकडून अद्यापही माहिती केंद्र शासनाकडे पाठविण्यात आली नाही त्यामुळे राज्य शासनाच्या विरोधात राळेगाव धोबी परीट महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी या आंदोलनात धोबी (परीट)महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन नाकाडे, तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे, राजू भासपाले,शरद साखरकर, विशाल पत्रकार, राजू नाकाडे, गौरव साखरकर,अरुण खामनकर, आदी उपस्थित होते.

Updated : 8 Sep 2020 12:21 PM GMT
Next Story
Share it
Top