Home > महाराष्ट्र राज्य > धान खरेदी केंद्र दिवाळीपूर्वी सुरू करावे;काँग्रेसची मागणी

धान खरेदी केंद्र दिवाळीपूर्वी सुरू करावे;काँग्रेसची मागणी

धान खरेदी केंद्र दिवाळीपूर्वी सुरू करावे;काँग्रेसची मागणी
X

म-मराठी न्यूज नेटवर्क

दिवाकर भोयर/धानोरा प्रतिनिधी

मो.9421660523

गडचिरोली/धानोरा :- आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सुरू करण्यात येणारे हमीभाव धान खरेदी केंद्र दिवाळीपूर्वी सुरू करण्यात यावे अशी मागणीआरमोरी येथील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. यासंदर्भात आदिवासी विकास महामंडळाच्या आरमोरी येथील उपप्रादेशिक व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती आनंदराव आकरे, विश्वास भोवते, नगरसेविका निर्मला किरमे, डोंगरगावचे माजी उपसरपंच भोलेनाथ धानोरकर ,स्वप्निल ताडाम ,सामाजिक कार्यकर्ते नीलकंठ सेलोकर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून आर्थिक पिळवणूक होऊ नये तसेच धानाला योग्य भाव मिळावा यासाठी महामंडळाच्यावतीने सहकारी संस्थांमार्फत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू केले जातात. सध्या हलक्या मध्यम प्रतीच्या धाण्याची कापणी व बांधणी सुरू असून अनेक शेतकरी मंडळी हि कामे करीत आहेत. आर्थिक अडचणीमुळे शेतकरी घरी साठवलेले धान्य दिवाळी सणा पूर्वी खासगी व्यापाऱ्यांना विकून आपली अडचण भागवण्याचा प्रयत्न करतो अशावेळी अत्यल्प भाव देऊन शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते त्यामुळे दिवाळीपूर्वी खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे असे निवेदनात म्हटले आहे..

Updated : 24 Oct 2020 4:50 PM GMT
Next Story
Share it
Top