धानोरा येथे ११३बटालियन च्या वतिने पार पडला आत्मनिर्भर कार्यक्रम .
X
दिवाकर भोयर धानोरा प्रतिनिधी 9421660523 धानोरा ता.प्रतिनिधी ------- धानोरा येथील ११३बटालियन केन्द्रीय रिजर्व पुलिस बल च्या वतिने विशेष सिविक एक्शन उपक्रमा अंतर्गत धानोरा तालुक्यातील विविध गावातिल बेरोजगार महिला व पुरुषानां आत्मनिर्भर करण्या साठी एक महिन्याचे प्रशिक्षण देवून त्यांच्या कुंटूबाचा प्रपंच चालण्यासाठी सामानाचे वाटप करण्यात आले.
श्री.जी.डी.पंढरीनाथ कमान्डेन्ट यांच्या मार्गदर्शना खाली महिलांना शिलाई मशीनचे ,पुरुषांनां मिस्ञि बांधकाम ,तर काही पुरुषानां वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देन्यात आले.जेने करुण पुलिस व ग्रामीण लोकामधे जवळीकता निर्माण व्हावी .तेथिल बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे.व कुटूंबानां कायमस्वरूपी कुटूंबाची उपजिविका ,प्रपंच चालवितायावे.कुटूंबाचा आर्थिक दृष्टीने स्वयंपूर्ण व्हावे.याच हेतूने शिलाई मशिनचे प्रशिक्षण पुर्ण केलेल्या २०महीलानां मशिनसह सामान ,२०पुरुषानां बाधकाम मिस्ञि सामानासह आणि 16पुरुषानां वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देवून वाहन चालविण्याचा परवाना वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला श्री.बाळू उंदिरवाडे उपाध्यक्ष नंगरपंचायत धानोरा ,ताराबाई कोंटागंले भाजपा महिला जिल्हा अध्यक्ष ,श्री.विवेक अहिरे एस.एच.ओ.पोलिसस्टेशन धानोरा,श्री.सोपानदेव मशाखेञि,बंडू हरने ,विवेक कुंभारे आदी मान्यवर उपस्थित होते.