धानोरा येथे शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याबाबत शेतकरी बचाव व शेतकरी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
X
म मराठी न्यूज नेटवर्क
गडचिरोली प्रतिनिधी/ राहुल दिपक येनप्रेडीवारे
धानोरा, दि.२० : केंद्रातील मोदी सरकारने देशातील शेती व शेतकरी यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले आहे. शेतकरी विरोधी तीन काळे यांच्या माध्यमातून देशातील हरित क्रांती नष्ट करण्याचा कुटील डाव रचला आहे. जगाचा पोशिंदा, अन्नदाता शेतकरी व शेतमजूर यांना काही उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचे हे एक मोठे षडयंत्र आहे. सविधान, संसदीय प्रणाली, संघराज्य व्यवस्था या सर्वांना धाब्यावर बसवून कोणतेही चर्चा अथवा संवाद न करता मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर हे तीन काळे कायदे मंजूर करून घेतले आहेत.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, संघर्ष हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी नवीन शेती विषयक तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे. करीता हुकुमशाही केंद्र सरकार विरोधात गडचिरोली जिल्हाभर शेतकरी बचाव तसेच शेतकरी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तसेच प्रामुख्याने शेतकरी व शेतमजूर यांना हे तीन काळे कायदे विषयी माहिती सांगून ते तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे अशी माहिती दिले. त्यानंतर कॉंग्रेस कमिटी चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माहिती सांगून प्रत्येक बूथ स्थरावर शेतकरी विरोधी विधेयक विरोधात शेतकरी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात यावी असे यावेळी सांगण्यात आले.