Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > धानोरा तालुक्यातील 323 शिक्षकांनी केली आरटिपिसिआर कोविड-19 टेस्ट*

धानोरा तालुक्यातील 323 शिक्षकांनी केली आरटिपिसिआर कोविड-19 टेस्ट*

धानोरा तालुक्यातील 323 शिक्षकांनी केली आरटिपिसिआर कोविड-19 टेस्ट*
X

म-मराठी न्यूज नेटवर्क दिवाकर भोयर धानोरा प्रतिनिधी 9421660523 .

गडचिरोली जिल्हा परिषदेने 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचे पत्र काढले. त्यानुसार तालुकास्तरावर वर्ग नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची covid-19 तपासणी करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात 323 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तपासणी करून घेतली त्यात 07कर्मचारी बाधित आढळले. वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय धानोरा जिल्हा गडचिरोली अंतर्गत नववी व दहावी ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची covid-19 तपासणी दिनांक 20 व 21 नोव्हेंबर ला वैद्यकीय ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे सकाळी 11 ते 12:30 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली होती. दोन दिवसाचे नियोजन करण्यात आला त्यानुसार 20 नोव्हेंबरला खाजगी शासकीय सर्व आश्रम शाळेतिल शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी तर 21 नोव्हेंबर ला धानोरा तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची तपासणी करन्यात आलि. पहील्या दिवसी159कर्मचार्याची तपासणी झालीत्यात 04बाधित तर दुसऱ्या दिवसि164कर्मचार्याची तपासनि करन्यात आली त्यापैकी 03बाधित मिळाले . ऐकुण३23पैकि 07बाधित आढळले. अशा पद्धतीने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी स्वतःची तपासणी पूर्ण करून घेतली. .बाधितांना कोरोना सेन्टर मुलांचे वस्तिगृह धानोरा येथे ठेवन्यात आले.मा. सावसाकडे अधीक्षक ग्रामीण रुग्णालय धानोरा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. तसेच ज्या कर्मचाऱ्यांची तपासनि बाकि आहे त्यांची तपासनि दिनांक 23/11/2020ला होनार असल्याचे त्यांनी कळविले आहे. कोरोना टेस्ट करण्यासाठी डॉक्टर शीतल टेंभुर्णे, धनेश कुळमेथे, डेव्हिड गुरनुले ,उज्वला बीडवाईकर ,डॉक्टर मारगिये, प्रयोगशाळा तज्ञ संदीप धात्रक, यांनी चाचणी यशस्वी करण्यात परिश्रम घेतले .दोन दिवसा पैकी जे शिक्षक उरलेले आहेत त्या सर्व शिक्षकांनी आपली स्वतःची चाचणी सोमवारला करून घेण्याचे आव्हान सुद्धा ग्रामीण रुग्णालयाचे अध्यक्ष सावसाकडे यांनी केले आहे.

Updated : 24 Nov 2020 6:28 PM GMT
Next Story
Share it
Top