Home > विदर्भ > धानोरा खुर्द ते अनसिंग रस्ता ठरतो अपघाताला निमंत्रण

धानोरा खुर्द ते अनसिंग रस्ता ठरतो अपघाताला निमंत्रण

धानोरा खुर्द ते अनसिंग रस्ता ठरतो अपघाताला निमंत्रण
X

फुलचंद भगत/मंगरूळपीर

मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा ते अनसिंग आसेगाव धानोरा खुर्द रस्त्यात खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते या रस्त्यावर दररोज वाहन चालकाचा अपघात होत आहे सुदैवाने जीवितहानी झाली नाही हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा ठरत असल्याने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण याचे काम झाले या रस्त्यावर शासनाने लाखो रुपये खर्च केला परंतु हा रस्ता निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने दोन वर्षातच या रस्त्याची वाट लागली या रस्त्याचे काम ठेकेदारामार्फत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने आज रोजी हा रस्ता शेवटच्या घटका मोजत आहे हा रस्ता रस्ता मंगरूळपीर ते अनसिंग रोडवर असून या रस्त्यावर शिवनी आसेगाव पिंपळगाव कुंभी अनसिंग इत्यादी गावे लागतात तालुक्यात हा रस्ता सदैव वर्दळीचा असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहन चालत आहेत या गावातील वाहन चालविणाऱ्या नागरिकांना हा रस्ता मोठा धोकादायक ठरत आहे शासन अपघात टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करतात परंतु या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने हा रस्ता आभाळ फाटलं त्याला ठिगळ कुठे लावणार असा झाला आहे या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने दुचाकी वाल्यांना चाल वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहेरात्रीचे वेळी या रस्त्यावर येणारी नवीन वाहने काही ठिकाणी रस्ता चांगला असल्याने वाहन जोरात हणतात परंतु त्यांना माहीत नसते की या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे तेव्हा त्यांचा अनेक वेळा अपघात झालेला आहेया रस्त्यावर खड्डे तर पडलीच आहे परंतु त्या खड्ड्यामध्ये बारीक किती जमा झाली असल्याने समोरून वाहन आल्यानंतर त्या वाहन चालकांना खड्ड्यातून वाहन घालवावी लागते तेव्हा गाडी स्लिप होऊन अनेक वेळा अपघात झालेले आहेत परंतु जीवित हानी झाली नाही ही महत्त्वाची बाब आहे दोन वर्षापूर्वी हा रस्ता बनला आहे परंतु आज रोजी हा रस्ता शेवटच्या घटका मोजत आहेतरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी या भागातील नागरिक येथील सरपंच सुभाष कावरे गजानन खोटे गोपाल संगेकर दाऊद मास्टर मुक्तार सागर साकीर शेख विष्णू फड उत्तम कुटे उमेश भेंडेकर यांनी केली आहे

Updated : 15 Nov 2020 3:33 PM GMT
Next Story
Share it
Top