Home > विदर्भ > दोन वर्षापासुन मत्स तळी बांधकामाचे दोन कोठी रुपयेचा अनुदान निधि द्या

दोन वर्षापासुन मत्स तळी बांधकामाचे दोन कोठी रुपयेचा अनुदान निधि द्या

"शेतकऱ्यांची मागणी"

म-मराठी न्यूज नेटवर्क

दिवाकर भोयर

धानोरा प्रतिनिधी

मो.9421660523 .

गडचिरोली :- आरमोरी तालुक्यातिल शेती व्यावसाया बरोबर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावी तलावातिल पाणी शेतातिल पिकांना उपलब्ध व्हावे, नवनवीन व्यवसाय करता यावे.जसे मत्य बिज तयार करणे,मत्सपालन करुण शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे याच करीत मत्स तळी बांधकाम योजना दोन वर्षापुर्वी शासनाने राबविलि .त्याचा लाभ तालुक्यातिल ३२ शेतकऱ्यांनी घेतला. शेतात मत्स तळी बांधकाम केले . परतु.बाधकाम पुण होऊनही तत्कालीन सरकारने मत्स तळी बाधकाचा निधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला नसल्याने शेतकरी राजाने उदार उसनवार करुणहि शासनाने निधी न दिल्याने शेतकरी आथिर्क संकटात सापडला आहे.- जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या कडे मत्स तळी बांधकाम करणाऱ्या शेतकऱ्यांचे दोन वर्षा पासुन प्रलंबित असलेले दोन कोटी रुपयाचे अनुदान तात्काळ देण्यात यावे अशी मागणी निवेदनातुन केली आहे.

शेतकऱ्यांनी शेती बरोबर इतर पुरक धंदे करून आर्थिक स्तर सुधारावा म्हणुन शासनाने शेतकऱ्यांना शेतातील खाली जागा असलेल्या ठिकाणी सन २०१७ -२०१८ ते २०१८-२०१९ या वर्षात शेततळे मंजुर करुण ओबिसी करिता ४० टक्के अनुदान तर ६०टक्के लाभार्थी हीसा, तसेच एस.सि.एस.टी संवर्गातील शेतकऱ्यांना ६० टक्के अनुदान ४० टक्के लाभार्थी हीसा असुन प्रत्येक लाभार्थी योजना ७ लाख रुपये मंजुर करुण ही योजना ३२ शेतकऱ्यांनी उसनवार कर्जे घेऊन मत्स तळी बांधकाम केले.परतु गेल्या दोन वर्षांपासून एकही रुपयाचा दमडी अनुदान शासन स्तरावरुण मिळाला नसल्याने गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यानी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वाखाली मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या कडे दोन वर्षा पासुन प्रलंबित असलेला मत्स तळी बांधकामाचा दोन कोटी अनुदान तात्काळ देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे.

या वेळी सरपंच मगरु वरखडे. राजु घोडाम. किशोर भोयर प्रदिप सडमाके आदी उपस्थित होते.

Updated : 25 Oct 2020 12:40 AM GMT
Next Story
Share it
Top