Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > दोंडाईचात नाभिक समाजाचा आर्दश विवाह सोहळा संपन्न...

दोंडाईचात नाभिक समाजाचा आर्दश विवाह सोहळा संपन्न...

दोंडाईचात नाभिक समाजाचा आर्दश विवाह सोहळा संपन्न...
X

प्रतिनिधी :- समाधान ठाकरे दोंडाईचा

दोंडाईचा- (श. प्र.) कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध करण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस, यांच्यापासून तर पंतप्रधान मुख्यमंत्री सैनिक म्हणून लढा देत आहेत. अशा संकटाच्या परिस्थितीत आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून दोंडाईचा येथे वधू-वरांनी आईवडिल आणि भटजींच्या उपस्थित अत्यंत साध्या पद्धतीने शुभ मुहूर्तावर विवाह करीत साताजन्माच्या गाठी बांधल्या. विशेष म्हणजे यावेळी लॉकडाउनचे तंतोतंत पालन करीत सोशल डिस्टन्स राखले आणि वधुवरासह भटजीनेही तोंडाला माक्स लावत मंगलाष्टके म्हटली.

मानपान, वाजंत्री, महागडे कपडे दागिने अशी सर्व हौस भागविता यावी म्हणून लॉकडाउनमुळे बहुतेक विवाह सोहळे रद्द झाले आहेत. मात्र, या सर्व रुढी परंपरेला फाटा देत आणि पैशांची होणारी उधळण टाळत आज दि. 25 जुन 20 रोजी तळोदा तालुक्यातील प्रतापपुर येथील वर भुषण आणि दोंडाईचा येथील वधू नुतन यांचा दोंडाईचा शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करीत शुभ मुहूर्तावर विवाह पार पडला. दि 25 जुन रोजी दुपारी 11 वाजता आई-वडील आणि भटजीच्या मंत्रोपचाराच्या साक्षीने भुषण आणि नुतन यांचा विवाह पार पडला कोरोना विषाणूची वाढती परस्थिती बघता मोजक्या नातेवाईक वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते. वधू-वरांच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत शुभ मुहूर्तावर अंत्यत साध्या पद्धतीने तोंडावर माक्स लावत हा विवाह पार पडला.

तळोदा तालुक्यातील प्रातपपुर येथील अशोक अमृत सोनावणे यांच्या मुलगा विवाह दोंडाईचा येथील नाभिक समाजाचे जेष्ठ सल्लागार जिल्ह्याचे माजी अध्यक्ष भावराव लकडू सैंदाणे यांची नात कैलास भाऊराव सैंदाणे यांच्या मुलीशी साध्या पध्दतीने आर्दश विवाह लावण्यात आले.

हा विवाह अगोदर 12 मे रोजी ठरविण्यात आला होता. परंतु देशासह राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असतांना पुढे ढकलण्यात आला होता. या विवाहासाठी वधू वराच्या कुटुंबियांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले. यावेळी माजी उपनराध्यक्ष रविंद्र देशमुख, भाजपा शहर अध्यक्ष प्रविण महाजन, बांधकाम सभापती निखील जाधव, नगरसेवक हितेंद्र महाले, ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे संचालक अमीत पाटील, जितू चव्हाण, डी. एम. चौधरी सर तसेच नाभिक समाज पदधिकाऱ्यांनी देखील या आदर्श विवाह प्रसंगी टप्प्याटप्प्याने हजेरी लावली..

Updated : 29 Jun 2020 5:46 AM GMT
Next Story
Share it
Top