Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > देलोडा (बुज) शाळेतील तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण उत्तीर्ण

देलोडा (बुज) शाळेतील तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण उत्तीर्ण

देलोडा (बुज) शाळेतील तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण उत्तीर्ण
X

विद्यार्थ्यांचे अभिनंदन

म-मराठी न्युज टिम

धानोरा प्रतिनिधी 9421660523

गडचिरोलि/आरमोरी :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आरमोरी तालुक्यातील देलोडा(बुज) जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. आरमोरी तालुक्यातील देलोडा गाव वडधा केंद्रात मोडत असून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी तिल तालुक्यातील 573 विद्यार्थी नोंदविले तर प्रत्यक्ष563मुलांनी परीक्षा दिली. तालुक्यातील 10 विद्यार्थी गैरहजर होते . संपूर्ण तालुक्यातून 115 विद्यार्थी पात्र ठरले त्यापैकी तीन विद्यार्थी देलवाडा (बुज)येथील आहेत, त्याची टक्केवारी 20. 40% टक्के एवढी आहे . शिष्यवृत्ती परीक्षेत हितेश भोयर, श्रेयश उरकुडे ,देवाशिष फुलके या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री .ए.डी .कोटगले मुख्याध्यापक पक, श्री.एस .वाय .श्रीराम सहायक अध्यापक, कुमारी व्हि.एम. दोनाडकर मॅडम, कुमारी एम .पी .सेमस्कर सहाय्यक अध्यापिका या सहगावातील लोकांनी अभिनंदन केले आहे.

Updated : 19 Oct 2020 3:55 PM GMT
Next Story
Share it
Top