Home > महाराष्ट्र राज्य > देलनवाडी बाजारात उलमडून पडलेल्या चिंचेच्या झाडाचे विल्हेवाट लावा;व्यापारी सह जनतेचि मागणी

देलनवाडी बाजारात उलमडून पडलेल्या चिंचेच्या झाडाचे विल्हेवाट लावा;व्यापारी सह जनतेचि मागणी

देलनवाडी बाजारात उलमडून पडलेल्या चिंचेच्या झाडाचे विल्हेवाट लावा;व्यापारी सह जनतेचि मागणी
X

देलनवाडी बाजारात उलमडून पडलेल्या चिंचेच्या झाडाचे विल्हेवाट लावा;व्यापारी सह जनतेचि मागणी

म-मराठी न्यूज नेटवर्क

(दिवाकर भोयर धानोरा प्रतिनिधी,मो. 9421660523)

गडचिरोली/आरमोरी . आरमोरी तालुक्यातिल देलनवाडि,मानापुर परिसरात दिनांक 07.10.2020रोज बुधवारला 3ते४वाजता विजेच्या कडकडासह वादळी पाउस झाला.याच वादळात परिसरातिल अनेक गावातिल झाडे ,ईलेक्ट्रिक खांब ,लाईनचे वायर तुटून पडले.याच वादळात देलनवाडी बाजार परिसरात जुने चिंचेचे झाड होते.ते वादळामुळे कोलमळून पडले.या घटनेला 15दिवस झाले.परंतु अजुन पर्यन्त पडलेल्या झाडाची विल्हेवाट लावल्या गेलि नाही. आरमोरी तालुक्या पासून 24किलोमिटर अतंरावर असलेल्या देलनवाडी येथिल आठवडि बाजारात असलेले झाड मुळासह पडलेले आहे.माञ याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे 15दिवस होवूनही तोडून उचलल्या गेले नाही. येथे भरणार्या आठवडी बाजारात व्यापारी लोक टूव्हिलर ,टेम्पो,ट्राँक्टर,ट्राँक्स ,पिकप असे चारचाकी वाहने घेवून येतात.तसेच बाजारा करिता आजूबाजूचे लोकही भाजिपाला घेन्याकरिता येतात.या लोकांना व वाहनधारकांना मोठी अडचण निर्माण होतो.त्यामुळे प्रशासनाने या समस्याकडे लक्षदेवून कोसळलेले चिंचेंचे झाड तोडून उचल करण्याची मागणी व्यापारी सह जनतेनी केलि .

Updated : 21 Oct 2020 9:28 AM GMT
Next Story
Share it
Top