Home > Crime news > दुय्यम निबंधक अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक 

दुय्यम निबंधक अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक 

दुय्यम निबंधक अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक 
X

दुय्यम निबंधक अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

पालघर,प्रतिनिधी/संजय लांडगे

पालघर/वाडा : वाडा तालुक्यातील प्रभारी दुय्यम निबंधक अधिकाऱ्यास वीस हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रंगेहाथ अटक केली आहे.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार वाड्यातील तक्रारदार बांधकाम व्यावसायिक यांनी

बांधलेल्या दत्तात्रय अपार्टमेंट इमारतीमधील गाळा क्र. १० व ११ यांची विक्री करण्यात आली असून त्यांचे रजिस्ट्रेशन करणे बाकी होते सदर गाळ्यांचे रजिस्ट्रेशन करीता वाडा येथील प्रभारी दुय्यम निबंधक सर्जेराव अभिमान चाटे यांनी प्रत्येक गाळ्यांचे १५ हजार रुपये प्रमाणे एकून तीस हजार रूपयांची मागणी केली होती म्हणून तक्रारदार यांनी एसीबी पालघर येथे तक्रार केली असता त्यांचे तक्रारीचे अनुषंगाने बुधवारी (दि.४) तक्रारदार यांना आलोसे यांचे कार्यालयात पंचासोबत पडताळणी करणेकरीता पाठवले असता आलोसे यांनी रजिस्ट्रेशन करीता तक्रारदार यांचेकडे तडजोडी अंती एका गाळ्याचे १० हजार रुपये असे दोन गाळ्यांचे २० हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने शुक्रवारी (दि.६) रात्री ६:४१ वा चे सुमारास तक्रारदार यांचेकडून २० हजार रुपयांची लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारत असताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.

सापळा पथक के. एस. हेगाजे पोलीस उप अधिक्षक, भारत साळुंखे पोलीस निरीक्षक, म.पो.ह.मांजरेकर,पो.ह. वा.कदम, पो.ना. सुवारे, पो.ना. सुतार, पो.ना. सुमडा, पो.ना.चव्हाण , म.पो.ना.जाधव, पो.शी. उमतोल, चा.पो.शि. दोडे यांनी कारवाई केली.

Updated : 7 Nov 2020 10:31 AM GMT
Next Story
Share it
Top