Home > महाराष्ट्र राज्य > दारूबंदीचे फायदे आणि नुकसान

दारूबंदीचे फायदे आणि नुकसान

दारूबंदीचे फायदे आणि नुकसान
X

पोलिसांचे हफ्ते वाढले त्यामुळे गुन्हेगारी कमी न होता परत वाढतच गेली

आता तरी शासन पालकत्वाची जबाबदारी पार पाडत राज्यातील मुलांना वाचवतील का ?

जाकीर हुसैन (यवतमाळ ) :

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात दारूबंदी तर झाली पण तो कागदोपत्री हजारो महिलांनी जणू महाकालीचे रूप धारन करत दारूबंदी प्रश्नावर आक्रमक होऊन हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरुन मोठ मोठे मोर्चे काढले ते बघून शासनाने महिलांचा सन्मान राखून कही जिल्ह्यात दारूबंदीचा कडवा निर्णय घेणे भाग पडले आणि या निर्णयाचे अनेक स्तरातून स्वागत सुद्धा करण्यात आले महिलांना वाटले आपल्या संसाराची राखरांगोळी होण्यापुर्वी शासनाने हा निर्णय घेणे आवश्यक आहे परंतू झाले उलट काही जिल्यात दारूबंदी तर झाली पण अवैध दारूबंदीला जोमाने सुरूवात झाली त्यामुळे उघड्यावर पडलेल्या महिलांचा संसार उलट रस्त्यावर आला या दारूबंदी नंतर त्यांची कोवळ मुल शाळा सोडून अवैध दारूचा व्यवसाय करून अनेक व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे तिचा उघड्यावरचा संसार हा रस्त्यावर आला दारूबंदीमुळे काही पोलिस मात्र गब्बर झाले पगार कमी असला तरीही मोठ मोठ्या गाडींची सफर करायला मिळत आहे दारूबंदीमुळे आपल्या पतीला लाॅटरी तर लागली नाही अशी चर्चा पोलिसांच्या गृहलक्ष्मी करतांना बघायला मिळते इतकच नाही तर काही पोलिसांच्या गृहलक्ष्मींनी आपल्याच खाकी वर्दीतील पतीची तक्रार करून त्यांचे पति सुद्धा या दारू तस्करी टोळीमध्ये शामिल असल्याचे दाखवून दिले पोलिसांचे हफ्ते वाढले त्यामुळे गुन्हेगारी कमी न होता परत वाढतच गेली एका आईचा कोवळ मुल सोळाव्या वर्षात अनेक व्यसनाशी जळल आणि बाप बनायच्या आधिच आपले प्राण गमावून बसला याला जबाबदार कोण? शासन कि दारूबंदी साठी रस्त्यावर उतरणार्या महिला हा एक प्रश्नच बनुन राहिला आहे याचा उत्तर काही केल्या सापडे ना विशेष म्हणजे विनाकारण शासन आपला करोडोच्या महसूलाचे नूकसान करतांना दिसत आहे गुन्हेगारी सुद्धा कमी न होता वाढलेली बघायला मिळाली.

अपघाताचे प्रमाण कमी झाले असे दावे काही नेते व शासन करायला लागले परंतू दारूबंदी नंतर दारू तस्कर असो की दारू पिण्यासाठी गेलेला व्यक्ति अपघातात मृत्यूमुखी पडला मग तो अपघात नव्हता तर दारूबंदीमुळे झालेली हत्या होती काय? अस म्हणायला वावग ठरणार नाही अशा अनेक प्रकरणात दारूबंदीमुळे बापाच्या आधी कोवळ्या मुलांना आपले प्राण गमवावे लागले आता तरी शासन पालकत्वाची जबाबदारी पार पाडत राज्यातील मुलांना वाचवतील का? असा प्रश्न दारूबंदीचा कडवा विरोध करणारे नागरी हक्क संरक्षण संघ भारतचे यवतमाल जिला अध्यक्ष जाकीर हुसैन यांनी केला आहे. अनेक महिलांना आपले पति व कोवळ मुले गमवावी लागली परंतू दारू सुरू करून आपल्या मुलांना वाचवण्याची विनवणी आता महिला सरकार कडे करतांना बघायला मिळत आहे.

जाकीर हुसैन

9421302699

Updated : 5 Jun 2020 12:48 PM GMT
Next Story
Share it
Top