दहा वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार करणारा मुख्य आरोपी अटक ग्राम खांदला येथील घटना
X
मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी (भुषण महाजन) :- मुर्तिजापूर तालुक्यातील ग्राम खांदला येथीला दहा वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार करणारा मुख्य आरोपी ग्रामीण पोलिसांनी अटक करून अकोला न्यायालयात हजर केले आहे. प्राप्त वृत्तानुसार मुर्तिजापुर तालुक्यातील खांदाला येथील सन 2018 मध्ये दिनांक 18/6/18 मध्ये आरोपी परविन उर्फ तुकाराम कपूरचं चव्हाण वय 24 वर्षे राहणार खांदला. याने शेजारी राहणाऱ्या 10 वर्षीय मतिमंद मुलीवर अनेकदा बलात्कार केला. या दरम्यान सदर मुलगी गर्भवती राहिली. यामधील आरोपी क्रमांक दोन गणपत सोळंके दिपाली गोपाल पवार यांनी सदर मतिमंद मुलीचा गर्भपात करण्यासाठी यवतमाळ येथील डॉक्टर दयाल चव्हाण यांच्याकडे घेऊन तिचा गर्भपात केला होता. सदर डॉक्टरांना कडे कोणतीही पदविका नसताना त्यांनी त्या मुलीचा गर्भपात केला. ग्रामीण पोलिसांनी या तिन्ही आरोपींना 2018 मध्ये अटक करून न्यायालयात हजर केले होते. ते सध्या जेलमध्ये आहे. परंतु तेव्हापासून मुख्य आरोपी प्रवीण चव्हाण हे फरार होता. जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीकांत यांनी आरोपी अटक मोहीमे दरम्यान ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार रहिम शेख यांनी सदर आरोपीला आज दिनांक 27 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी पाच वाजता दरम्यान अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीकांत व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रहीम शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत बोरकार, सुभाष उघडे, अनिल अहेरवाल, स्वप्नील फालके लांजेवार यांनी आरोपीला अटक करून अकोला न्यायालयात हजर केले होते.
भुषण महाजन मो.नं. – 9850024474 / 9156273113