//दहावीच्या परीक्षेत अमरावती विभागातून आदिवासी मुलीमधून पल्लवी आत्राम प्रथम//
M Marathi News Network | 17 Aug 2020 3:52 AM GMT
X
X
् राळेगाव तालुका प्रतिनिधी ् राळेगाव तालुक्यातील वरूड जहागीर येथील रहिवासी पुंडलिक रामराव आत्राम यांची मुलगी कु.पल्लवी पुंडलिक आत्राम ही नुकत्याच पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेत 88.40% टक्के गुण मिळवून आदिवासी विकास अमरावती विभागातून आदिवासी मुलीमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून तीला 9आॅगष्ट 2020 रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पल्लवीला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले असून तीच्या या सत्कारामुळे वरूड जहागीर या गावात आनंदाचे वातावरण पसरले असून ती आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधू भगिनींना देत असून गावातील सर्व नातलग, आई-वडील, मित्र-मैत्रिणी यांनी पल्लवीचे अभिनंदन केले आहे.
Updated : 17 Aug 2020 3:52 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire