Home > महाराष्ट्र राज्य > त-हाडी परिसरात येथे बळीराजाची कृषी केंद्रावर गर्दीच गर्दी.

त-हाडी परिसरात येथे बळीराजाची कृषी केंद्रावर गर्दीच गर्दी.

त-हाडी परिसरात येथे बळीराजाची कृषी केंद्रावर गर्दीच गर्दी.
X

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन खते बि बियाणे ची विक्री.

त-हाडी /प्रतिनिधी.. (महेंद्र खोंडे)

शिरपूर तालुक्यातील त-हाडी परिसरात मध्ये

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्स चे पालन करुन बि बियाणे खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांसाठी नियमांना फाटा न देत पालन करुन बियाणे विक्री करण्यात येत आहे. मागील वर्षीच्या पावसानंतर खरिप आणि रब्बी हंगामावरही जास्त पावसाने खरीपसह रब्बीच्या पिकांना जोरदार फटका बसला परंतु शेतकरी आता पुन्हा एकदा नव्याने कृषी केंद्रावर गर्दी करतांना दिसु लागले आहेत.

एक वर्षानंतर बी बियाणे रासायनिक खते घेतांना शेतकरी मोठी गर्दी करतांना दिसत आहे. मागील वर्षांत खरिप हंगामात चांगला पाउस झाला मका सोयाबीन कापुस भुईमूग कांदा आदी पिकांचा चागला पेरा झाला होता त्यानंतर जास्तीच्या प्रमाणात पाउस झाला आसतांना नंतर आॅगस्ट च्या सुरुवाती पासुन रब्बीच्या पिकांचा मोठी हानी शेतकर्‍यांना सहन करावी लागली परिणाम खरिप पिकावर होऊन शेतकर्‍यांच्या हाती काहीच आले नसतांना रब्बीच्या पिकांची पेरणी केली मात्र वरुन राजाच्या अति प्रमाणामुळे खरिप हंगाम हातचा गेला नंतरही पावसाच्या प्रमणामुळे रब्बीच्या हंगमावरही प्रश्न निर्माण झाले होते परिणामी शेतकर्‍यांच्या हाती दोन्हीही हंगाम आले परंतु खर्च जास्त आणी उत्पन्न कमी अशी परिस्थिती राहीली त्यामुळे पेरणी साठी खते बि बियाणे आणि फवारणी साठी औषधी खरेदी करण्याची संधी शेतकर्‍यांना पुन्हा मिळाली परंतु नफा तोटा सारखाच.. राहील्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही चांगला पाऊस पडणार असल्याचे संकेत मिळाले आसल्याने शेतकरी बि बियाण्यांच्या दुकानात वर्षे भरानंतर गर्दी करतांना दिसत आहे.

प्रतिक्रिया (१)

"मागील वर्षी जास्त अभावी खरिपाची पेरणी झाली नंतर रब्बी हंगामातही चांगल्याप्रकारे पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांनी पेरणी केली. शेतकर्‍यांना खरेदी करण्याची संधी मिळाली परंतु आता बि बियाणे रासायनिक खते घेण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रावर गर्दी करीत आहेत"

प्रविण मोहन पाटील..

  • कृषी सेवा केंद्र चालक..त-हाडी

प्रतिक्रिया (२)

बियाणे खते घेण्यासाठी सोशल डिस्टन्सचे पालन करुन बियाण्यांची खरेदी करण्यात येत आहे तर दुकानमालकाने सेनिटायझर ठेऊन वापर करण्यास सांगत आहेत तोंडाल मास्क आसल्या शिवाय विनाकारण गर्दी करु नये असेही वारंवार सांगत आहेत.

विशाल बालु कंरके.

शेतकरी त-हाडी..

फोटो -त-हाडी ता शिरपूर येथे कृषीसेवा केंद्रावर बियाणे घेतांना शेतकरी

-----------------------

Updated : 5 Jun 2020 11:39 AM GMT
Next Story
Share it
Top