Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > तुमच्या मुठभर राशन ने आमचे मोडकळीस आलेले संसार नीट होतील काय ? ......डॉ.जितीनदादा वंजारे

तुमच्या मुठभर राशन ने आमचे मोडकळीस आलेले संसार नीट होतील काय ? ......डॉ.जितीनदादा वंजारे

तुमच्या मुठभर राशन ने आमचे मोडकळीस आलेले संसार नीट होतील काय ? ......डॉ.जितीनदादा वंजारे
X

बीड ÷ लॉकडाउन वर लॉकडाउन पडत आहे.उद्योग धंद्याची पुरती वाट लागलेली आहे,लघुउद्योग बंद पडन्याच्या मार्गांवर आहेत.सामान्य माणूस हवालदिल झाला आहे.दहा रुपयाची वस्तू विस रुपयाला मिळायला लागली आहे.महागाई गगनाला भिडली आहे.जिडीपी रेट केंव्हा नव्हता तो गेल्या सत्तर वर्षात सर्वात खाली आला आहे.सामान्य माणसाला जगन मुशकील झाले आहे.कोरोना महामारीने भिकाऱ्याना पण भीक मिळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.मोठमोठ्या शहरांत स्मशान शांतता आहे ,लोक परेशान आहेत रोगाच्या नावाखाली नुसता भ्रष्टाचार चालू आहे अशी असणारी परिस्थिती आहे.याला कारणीभूत निसर्ग की ही कोंडी मानवनिर्मित आहे याचा आज आपण खुलासा घेऊ.

जगात कोरोना पसरला नाही असं नाही पण भारतातच याला जास्त दिवस का लागतात ? भारत देश आजही पूर्वपदावर येत नाही याला कारण काय ?इतर देशात महाभयंकर परिस्थिती असताना त्यावर नियंत्रण आलाय मग आपल्याकडे का नाही ? याचा एक सुजाण नागरिक या नात्याने सर्वांनी विचार करायला हवा तर या अभ्यासातुन आलेले निष्कर्ष असे ते माझ्या मते खालीलप्रमाणे आहेत - 1)शासन कोरोना महामारी व लॉकडाउन चा उपयोग स्वतःची झालेली हार लपवण्यासाठी वापरत आहे.2)जीडीपी रेट कमी झाला आणि तो सातत्याने कमीच होत आहे याच अपयश लपवून ठेवायच आहे ? 3)लॉकडाउन च्या काळात घटनेत काही असे बदल करायचे आहेत की ते सामान्य माणसाच्या अहिताचे असतील.(मागासवर्गीय विभाग बदल)4)सरकार सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा काम करते आहे ?कोणी बोलणारा व्यक्ती लगेच देशद्रोही ठरवला जातोय.5)दलित अत्याचार घटनेत सातत्याने वाढ होताना दिसतेय याला सरकार प्रतिबंध घालत नाही.यावर कठोर शासन नाही 6) विद्यार्थ्यांविषयी शासन गंभीर नाही .तब्बल वर्ष वाया जाऊनही त्यांच्या शैक्षणिक जीवनाच व्यवस्थापनाकडे सरकार पाठ फिरवताना दिसतंय 7)करोडो विद्याविभूषित लोक बेरोजगार जीवन जगतात.हाताला काम नाही.सरकारी तर सोडाच खाजगी पण नौकरी नाही. 8)शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळत नाही,हमीभाव,पीककर्ज,कर्जमाफी,बी बियाणे,इतर योजना याचा अभाव दिसतो आहे. 9)एस टि ,विद्युत,महापुरुश्यांच्या नावाची महामंडळ शोभेची वस्तू बनली आहेत. यावर योग्य व्यवस्थापन अभाव दिसतो आहे.10)कोरोना काळात आलेली अफाट मदत गेली कुठे ? इतका पैसा मदत आलाय की तो वाटला तर एका माणसाला कमीत कमी चालीस लाख वाट्याला येईल मग हा पैसा गेला कुठे ? 11)नौकरी गेली,उद्योग ठप्प,उपासमारिची वेळ काहींवर येऊन ठेपली आहे.याला जबाबदार कोण ? ही सर्व अनुत्तरित प्रश्न उत्तरे लक्षात घेऊन शासनाला जबाब विचारायला पाहिजेत.देशाच वाटोळं होताना डोळ्यात कुसळ गेल्यागत आपण बसलो तर तुमच्या जिंदगीवर थू . आपण पेटून उठलो पाहजेत आपल्याला राग आला पाहिजे.मंदिर, मस्जिद चर्च,गुरुद्वार यावर बसण्यापेक्षा शाळा,महाविद्यालय,नौकरी भरती,शेती सुधार योजना यावर आपले लक्ष केंद्रीत पाहिजे.आपला मामू कोणी करू नये आणि असं जर वाटत असेल तर असल्या धूर्त राजकारण्यांना धडा शिकवायला पाहिजेच असे परखड मत मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.

शासनाला मुळ मुद्दे बाजूला ठेवायची आहेत त्यावर विचार करायचा नाही.सरकार जर जनतेच्या हिताचे निर्णय घेत नसेल तर असे जनता विरोधी सरकार काय कामाचे असा परखड सवाल मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केला आहे.आपले मुळ मुद्दे जनतेच्या लक्षात येण्या अगोदर झालेले अपयश झाकण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न केंद्र सरकार करताना दिसतंय.नौकरी भरती,बेरोजगारी,महागाई,सतत कमी होणारा जीडीपी रेट,शेजारील देशाचे आक्रमन,आर्थिक अस्थर्य ,शेती व्यवस्थापन,विध्यार्थी प्रश्न ,आरोग्य ,शिक्षण ,सरकारी योजना ह्यावर मोदी कधीच मन की बात बोलत नाहीत याउलट मस्जिद,मंदिर व इतर कुछकामी गोष्टी मात्र त्यांच्या भाषणात आवर्जून असतात.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो पर्यंत ह्या देशात दगडाच्या मुर्ती वर लाखो लिटर दूध वाया घालणारी लोक तेच दूध एका भुकेजलेल्या गरिबाला दान देणार नाहीत तोपर्यंत आपल्या देशात खरी वैचारिक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही पण मोदीजी च्या असल्या विषयाकडे पाहून आपण शैक्षणिक प्रगती सोडून भिकारी बनवण्यावर जोर देतोय की काय अशी शंका येते आहे.पण आता आपण हुशार होऊ,सत्ता आल्यावर पाच वर्ष सीमेवर युद्ध होत नाही,देशात हल्ले होत नाहीत पण सत्ता संपत असताना मात्र याला चेव येतो ती आपोआप वाढतात याच लॉजिक काय ? हजारो जाग्यावर चेकपोस्ट असताना कसाब ताज हॉटेल पर्यंत पोहचतोच कसा ? आणि जबाबदार ,कर्तव्यदक्ष अधिकारीच मारतो कसे ? चेकपोस्ट असताना 200-200 किलो rdx स्फ़ोटके घेऊन अतिरेकी भारतात शिरतातच कशी ? आम्हाला तर देशात मंत्र्याच्या ताफ्यात सुध्दा शिरता येत नाही एव्हडी आपली सुरक्षा यंत्रणा मजबूत आहे.मग आपली 56' ची छाती यां अतिरेक्यांना का रोखून धरत नाही ? 15 लाख अकाउंट ला देण्याच्या गप्पा मारणारे अद्भुत चमत्कारी नेत्यांनी पैसे देण्याऐवजी आमचेच बँकेतील पैसे खाल्ले.पेट्रोल के दाम कम हुये की नही म्हणत देशाच्या सर्व सरकारी कंपन्या विकायला काढल्या पण पेट्रोल चा भाव काय कमी झाला नाही.नुसत्या थापाड्या मारणाऱ्या माणसाला एक दिवस जनता बूट मारेल यात शंका नाही खोटं बोल पण रेटून बोल अशी परिस्थिती आहे.महागाई साठी आंदोलन करणारे सत्ता पिपासूं लोक आज सत्तेत असताना मूग गिळून गप्प आहेत .सगळेच एकाच माळेचे मनी आहेत पण ढोंगी साधू बनून लुटणारा नेता यापूर्वी भारतवासियांना प्रचित नव्हता .आता सत्ता बदल करून ही भारतमाता पूर्ण बरखास्त झाली आहे.आता विनाश नक्कीच आहे.या देशाची वाट एक लबाड राजकारणी नक्कीच करू शकतो असे परखड मत जेष्ठ विचारवंत मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.

तुम्हाला काय कमी आहे.तुम्ही तुमच्या हजारो पिढ्याच कमावून बसला आहात पण जो आज खाल्ले तर उद्याची भ्रांत ज्याला असतें त्याचा पण विचार करा ? रिक्षा, टॅक्सी,कार चालक,पेंटर,बिगारी,मजुर,नाव्ही,कोळी,भटके विमुक्त ,भिकारी ,दर् बदर फिरणारे गरीब लोक,प्लम्बर,ड्रायवर,रस्त्याच्या कडेवर बसून छोटी मोठी वस्तू विकणारे,सिग्नल वर फिरून दोन पैसे कमावणारे लोक यावरही सरकार ने गांभीर्याने लक्ष देऊन आता लॉकडाउन टाकताना विचार करायला हवा.नुसतं राशन देऊन लोकांची प्रश्न सुटत नसतात उलट गुंता होऊन लोक जिवंत मारतील त्या अगोदर काही पर्यायी मार्ग शोधला पाहिजे आणि या महामारित उद्धवस्त होणारे लाखो संसार सरकार ने पूर्ववत आणायलाच पाहिजेत असे मत सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.

लेखन - सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत - मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर-9922541030

Updated : 18 Aug 2020 8:38 AM GMT
Next Story
Share it
Top