Home > विदर्भ > तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे खाते फोड ( सातबारा अलग करण्यात यावे

तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे खाते फोड ( सातबारा अलग करण्यात यावे

तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे खाते फोड ( सातबारा अलग करण्यात यावे ) प्रलंबित वनहक्क दावे , निराधार वृद्धांचे मानधन, प्रलंबित रेशन कार्ड तत्काळ देण्यात यावे ! आमदार डॉ देवराव होळी

आकाश झाडे चामोर्शी

तालुका प्रतिनिधि

मो.9545023844

चामोर्शी- येथील आमदार जनसंपर्क कार्यालय येथे आज तालुक्याचे नवनियुक्त तहसिलदार.अवतारे यांनी आमदार डॉ देवराव होळी यांना सदिच्छा भेट दिली यावेळी आमदार डॉ देवराव होळी यांनी तहसीलदार अवतारे यांचे हार्दिक स्वागत केले व पुन्हा तहसीलदार अवतारे यांना पुढे उपविभागीय अधिकारी व उपजिल्हाअधिकारी म्हणून सुद्धा काम बघायचे आहे

सध्या तालुक्यातील प्रोबेशन कार्यकाळात तहसीलदार अवतारे यांच्या कार्यकाळात सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळावा यासाठी कार्य करण्याचा सल्ला दिला यावेळी बोलतांना आमदार डॉ देवराव होळी यांनी

तहसीलदार अवतारे यांना आमदार डॉ होळी यांनी निर्देश दिले आपण स्वतः पुढाकार घ्यावा व तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी व शेतमजूर व नागरिक अबाल वृद्धांना न्याय मिळवून द्यावा याकरिता तमाम शेतकऱ्यांचे खातेफोड

( सातबारा उतारा अलग करण्यात यावा )

तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित असलेले वनहक्क दावे निराधारांचे प्रलंबित मानधन तत्काळ देण्यात यावे ,तहसील कार्यालयात पेंडींग असलेले नवीन

व जुने रेशन कार्ड ,अतिवृष्टी व पुराने नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत नुकसान

भरपाई मिळू शकली नाही त्यांना नुकसान भरपाई मिळावी व इतर

महत्त्वाच्या समस्या सोडवण्यात यावे नवीन तहसीलदार म्हणून प्रोबेशन काळात आपण सर्वसामान्य माणसाला न्याय देऊन नावलौकिक करावा असा सल्ला दिला

व विविध समस्या सोडवण्याची मागणी केली.

यावेळी मेक इन गडचिरोली चे.जिल्हा संयोजक रमेश अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते..

Updated : 24 Oct 2020 5:20 PM GMT
Next Story
Share it
Top