Home > विदर्भ > तालुका क्लिनिकमध्ये ३२ रुग्णांवर उपचार

तालुका क्लिनिकमध्ये ३२ रुग्णांवर उपचार

तालुका क्लिनिकमध्ये ३२ रुग्णांवर उपचार
X

तालुका क्लिनिकमध्ये ३२ रुग्णांवर उपचार...

म-मराठी न्युज नेटवर्क.

दिवाकर भोयर/ धानोरा प्रतिनिधी मो.9421660523

गडचिरोली/आरमोरी:-गडचिरोली मुक्तीपथ अभियानाच्या वतीने गडचिरोली व आरमोरी तालुका कार्यालयात दर सोमवारी व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन केले जाते. या दोन क्लिनिकच्या माध्यमातून एकूण ३२ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

गडचिरोली शहरातील बस डेपो जवळ स्वराज हेल्थ क्लब समोरील मुक्तिपथ तालुका कार्यालयात सोमवारी एकूण १२ रुग्णांनी भेट देऊन उपचार घेतला. आरमोरी शहरातील नवीन बसस्थानकाच्या मागे शक्तीनगर येथील मुक्तीपथ तालुका कार्यालयात आयोजित क्लिनिकमध्ये २० रुग्णांनी उपचार घेतला. अशा एकूण ३२ रुग्णांवर उपचार करण्यात आला. यावेळी क्लिनिकमध्ये दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूची सवय सोडण्यासाठी तसेच यातून उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती देत व्यसनी रुग्णांना समुपदेशन करण्यात आले. मुक्तीपथ तालुका कार्यालयांमध्ये ठराविक दिवशी क्लिनिकचे आयोजन केल्या जाते. दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असणा-या जास्तीत जास्त रुग्णांनी क्लिनिकला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Updated : 4 Nov 2020 1:44 AM GMT
Next Story
Share it
Top