Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > तानूबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी जयकुमार अडकिने यांची नियुक्ती !

तानूबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी जयकुमार अडकिने यांची नियुक्ती !

तानूबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी जयकुमार अडकिने यांची नियुक्ती !
X

श्री क्षेत्रमाहूर/ता.प्र.पदमा गि-हे

मराठा सेवा संघाच्या बत्तीस कक्षात पैकी महत्वपूर्ण बुद्धिवादी कक्ष म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या तानुबाइ बिर्जे पत्रकार परिषदेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदावर पत्रकार जयकुमार अडकिने यांची निवड करण्यात आली आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक युगपुरुष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर, राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील महाजन, यांचे मार्गदर्शनात पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास दादा पाटील यांनी नुकतेच जयकुमार अडकिने यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे या नियुक्तीबद्दल सोपानराव क्षीरसागर, शिवाजीराव पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष पंडितराव कदम, नानाराव कल्याणकर, विखे पाटील कृषी परिषदेचे कार्याध्यक्ष भागवत देवसरकर, विदर्भ संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर चौधरी पाटील, जिल्हा प्रवक्ते भाऊसाहेब नेटके, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कराळे पाटील, तालुकाध्यक्ष दिगंबर जगताप, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष विशाल शिंदे पाटील, सुधीर जाधव, प्रा.प्रवीण बिरादार सह जिल्हा व तालुकाभरातून अनेकानी जयकुमार अडकिने यांचे अभिनंदन केले आहे.

Updated : 10 Sep 2020 1:15 PM GMT
Next Story
Share it
Top