Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > तहसिल कार्यालयावर ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीचा मोर्चा

तहसिल कार्यालयावर ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीचा मोर्चा

तहसिल कार्यालयावर ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीचा मोर्चा
X

म मराठी न्यूज टीम

मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन

मुर्तिजापूर तालुका प्रतिनिधी :- ओबीसीच्या विविध मागणीची पूर्तता करून शासनाने राष्ट्रीय जनगणनेत ओबीसीची जनगणना करावी तसेच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावु नये असे आवाहन महात्मा फुले समता परिषदेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार प्रा.तुकाराम बिडकर यांनी केले.

ओबीसी आरक्षण बचाव,व ईतर मागण्यांसाठी मुर्तिजापूर येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.त्या प्रसंगी माजी आमदार प्रा.तुकाराम बिडकर बोलत होते. दरम्यान सर्व प्रथम संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच मुंबई येथील अतीरेक्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या बांधवांना अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ झाला, दरम्यान ओबीसींच्या कल्याणासाठी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले, प्रसंगी महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सदाशिव शेळके, विभागीय संघटक गजानन इंगळे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, महात्मा फुले समता परिषदेच्या महीला जिल्हाध्यक्ष मायाताई ईरतकर, कल्पना गवारगुरु,दिपमाला खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवाकर गावंडे, सुषमा कावरे आदींनी आपले विचार व्यक्त केले व अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर २ डिसेंबर रोजी ओबीसींच्या आरक्षण बचाव सह विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले, या प्रसंगी नगरसेवक विनायक गुल्हाने, नरेश विल्हेकर, बाळु टाक, महेंद्र बोळे, विशाल शिरभाते, सुरेंद्र वरोकार, किशोर सोनोने, प्रशांत डाबेराव,विष्णु लोडम,विष्णु शिंदे,शुभम मोहोड, दादाराव किर्दक, सुरेंद्र मेहरे, नाना मेहर,पत्रकार एल.डी.सरोदे, इब्राहिम घाणीवाले, मंगलाताई गवई,अतुल गावंडे, विजय इंगळे,पत्रकार सुमित सोनोने,मधुसूदन ढोरे,किरण इंगळे, संजय गावंडे, रामदास धुळे, प्रमोद म्हैसने, मनोज बाईस्कर, सुनील चव्हाण सह शेकडो ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

भुषण महाजन मो.नं. – 9850024474 / 9156273113

Updated : 27 Nov 2020 6:15 PM GMT
Next Story
Share it
Top