तळणी कुर्हा येथिल अवैध्य विकली जाणारी दारू बंदी साठी धडकला घाटंजी पो. स्टेशन येथे महीलांचा जमाव
M Marathi News Network | 9 Sep 2020 7:09 AM GMT
X
X
घाटंजी तालूक्यातिल तळणी कुर्हा येथे अवैध्य दारू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे त्यामुळे जवान पिढी सुध्दा दारु च्या आहारी जात आहे याची झळ स्त्रियांनाच जास्त प्रमाणात भोगावी लागत आहे. यापूर्वी बर्याच दा दारू विक्रेत्याच्या विरोधात तक्रारी देऊन सुद्धा कोणतिच कार्यव्हाई होत नसल्याने येथिल जनतेला ह्याचा त्रास सहन करावा लागत आहे आतातरी ठाणेदार साहेबांनी जातिने लक्ष्य देऊन कुर्हा येथिल दारू बंद करून जनतेवर होणारा अन्याय दूर करावा असे कूर्हा येथिल तंटामुक्ति अध्यक्ष रमेश आत्माराम राठोड यांनी दीलेल्या मुलाखतित सांगितले . या प्रकरणाची घाटंजी पो. स्टेशन ला रितसर तक्रार करून न्याय मिळण्याची मागणी केली.
संजय ढवळे घाटंजी ता. घाटंजी
जि. यवतमाळ
Updated : 9 Sep 2020 7:09 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire