Home > विदर्भ > तब्बल 27महिन्या नंतरही -धानोरा -रांगी मार्गाचे काम अपूर्ण .

तब्बल 27महिन्या नंतरही -धानोरा -रांगी मार्गाचे काम अपूर्ण .

तब्बल 27महिन्या नंतरही -धानोरा -रांगी मार्गाचे काम अपूर्ण .
X

दोन महिन्यांपासून रोडवर पसरविली आहे गिट्टी.

धानोरा ता.प्रतिनिधी................................ में 2018 मधे धानोरा ते ठाणेगाव मार्गाच्या रस्त्याचे रूंदीकरण ,मजबुतिकरण,व डांबरीकरण करण्या करिता कंञाटदाराने सोडे गावापासून खोदकाम सुरु केले .माञ तब्बल २७ महिने लोटूनही रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने धानोरा तालुक्यातील लोकांच्या मनात राग असला तरी याचा नाहक त्रास मागील ०२ वर्षापासून परिसरातील जनता जनार्दन सोसत असून अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन दोन महिन्यापासून रस्त्यावर टाकलेल्या गीट्टीचा त्रास नागरिकांना होत असल्याने कंत्राटदाराने सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनधारकांनी केलेली आहे.

प्रत्यक्ष मे 2018 मधे खोदकाम केल्यानंतर कालांतराने पावसाळा सुरु झाला.नंतर काही तांत्रिक अडचणी आल्या मग रस्ताच वाहून गेला मार्च पासून करोना(कोविड-19) संसर्गामुळे देश लाँकडावून मधे अडकला.ईथेच अडला धानोरा रांगि ,वैरागड मार्गाचे काम अशाही परिस्थितीत सोडे ते मोहली मार्गावर जून ,जुलै २०२०मधे परत कामाला सुरुवात करण्याकरिता गिट्टी टाकुन पसरविण्यात आले. लोकांना वाटायला लागले कि आता काम पुर्ण होईल पण हीअपेक्षा फोल ठरली.संप्टेबर 2020उजाडले पण काम जैसे थेच आहे.अशाही कठिण परिस्थितीत मोठी कसरत करत वाहने लोक काढतात. त्यानंतर मोहली ते रांगी-विहीरगाव १८कि.मि.मार्गावर जागोजागी खड्डे पडले . गिट्टी बाहेर निघाली असल्याने रस्त्यावरुन वाहन चालने कठिन झाले. कंत्राटदारांच्या दुर्लक्षित पणामुळे मागील २७ महीन्या पासुन या मारगाची रेलचेल बंद झालि.असल्याने हा राज्यमार्ग आहे कि काय अशी शंकाच लोकांच्या मनात निर्माण झालेलि आहे.तरी अधिका-यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे ,महाराष्ट्र शासनाने धानोरा -रांगी-वैरागड -ठाणेगाव या 40कि.मी.अंतराचे रुंदीकरण व मजबुती करिता निविदा काढली याचे कंञाट खाजगी कंपनीला झाले.त्यानंतर धानोरा कडून काम करण्या करिता सोडे गावापासून मोहलि गावाजवळ पर्यंत संपूर्ण रस्ता खोदण्यात आला.माञ प्रत्यक्ष २०१९पर्यन्त कामाला सुरूवात करण्यातच आलि नाही. परंतु दररोज चालनार्या जड वाहनाने रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहन चालने कठीन झाले अशातच मागिल पावसाळ्यात पावसाचे पाणि मोठ्या प्रमाणात आल्यामुळे मार्गावर खोल दानी निर्माण झाल्या.त्यावर परत कञंट दाराने मातिमिश्रित मुरुम टाकल्याने मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाले.आणि धानोरा ते मोहलीरस्ता पूर्णपणे बंद पडला.ईथुनच सुरु झालि प्रवाशाचि ,वाहन धारकाचि होरपळ.अशातच तालुक्यात झालेल्या अतिवृष्टिने पुसावडि नाल्या समोरिल रस्ता मागिल वर्षात पुर्णपणे वाहून गेला होता.त्यानंतर कसातरी तात्पुरता थातुरमातुर सुरु झाला.याचि दखल ना लोकप्रतिनिधींनी घेतली, ना अधिकारी.याचा शारिरीक ,मानसिक ,आणि आर्थिक ञास परिसरातिल जनता सोसत आहे.

त्यामुळे या मार्गावरुन कोनतेही वाहन धावताना दिसत नव्हते.अशाच स्थितीत बस बंध पडल्याने मुलांच्या भवितव्याचि चिंता विद्यार्थ्यांच्या पालकांना तेव्हा पासुनच सतावत आहे.सोबतच रांगी ते आरमोरी मार्गावर पावसामुळे मधे मधे मोठाले भगदाड पडल्याने हाही रस्ता लोकांचे जीव घेनारारा असाच आहे .कारण या रस्याचे काम कधि सुरु होणार हे कुणिच छातिठोक पणे सागतांना दिसत नाहीत.याचा नाहक ञास लोकांना,विद्यार्थ्यांना ,वाहन धारकांना कर्मचाऱ्यांना,परिसरातील नागरिकांना सोसावा लागत आहे. उन्हाळ्यात रस्त्याचे काम सुरू होईल अशी अपेक्षा लोकांना असताना कोविळ -19 संपूर्ण देश लाक डाऊन मध्ये सापडला. आणि रस्त्याचे काम अडले.आणि परत पावसाळा सुरू झाल्याने वाहनांची रेलचेल बंद झाली अनेक लोकांनी दुसऱ्या मार्गाचा अवलंब केला आणि अशाच पावसाळ्यात रस्त्याचं काम सुरू करण्याकरिता कंत्राटदाराने सोडे पासून मोहली गावाजवळ पर्यंत रस्त्यावरती गीट्टी पसरवली हीच गिट्टी वाहनधारकांना आणि वाहनांना टोचत असून धानोरा तालुक्यातील लोकांच्या नशिबी असलेले रस्त्याचे भोग संपता संपेना. रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे तालुक्याच्या विकासात निर्माण झालेली बघायला मिळते. (हाच तो रस्ता ज्यावर संपूर्ण रस्ताभर गाळी गिट्टी पसरवीन्यात आलेली .ईथुन चारचाकि वाहन जाऊ शकत नाही.)

Updated : 8 Sep 2020 10:20 AM GMT
Next Story
Share it
Top