Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > ड्रग्स म्हणजे नेमके काय असते ? ड्रग्स घेणाऱ्यांची लक्षणे काय आणि यापासून सुरक्षित कसं राहायचं | What exactly are drugs? What are the symptoms of drug users and how to stay safe from it

ड्रग्स म्हणजे नेमके काय असते ? ड्रग्स घेणाऱ्यांची लक्षणे काय आणि यापासून सुरक्षित कसं राहायचं | What exactly are drugs? What are the symptoms of drug users and how to stay safe from it

ड्रग्स म्हणजे नेमके काय असते ? ड्रग्स घेणाऱ्यांची लक्षणे काय आणि यापासून सुरक्षित कसं राहायचं | What exactly are drugs? What are the symptoms of drug users and how to stay safe from it
X

गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून आपल्या कानावर सतत काही शब्दांचा वर्षाव सुरु आहे. त्यापैकी काही मुख्य शब्द म्हणजे कोरोना, आत्महत्या आणि त्याहूनही मोठा शब्द म्हणजे ड्रग्स. पण हे ड्रग्स असते तरी काय ? याची लक्षणे काय ? व आयुष्य कसे बरबाद होते हे जाणून घ्या.ड्रग्स म्हणजे काय असते ? ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते. त्यांना मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणजेच ड्रग्स म्हणतात. अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन इ. पदार्थ, कोकेन, भांग, गांजा, चरस (हशिश) या पदार्थाचा मादक पदार्थात समावेश केला जातो. ब्राऊन शुगर, झंडूबाम रुमालवर टाकून त्याचा नाकाद्वारे वास घेतात. यातून त्यांना नशा येते. स्पिरीटचाही नशेसाठी अशाचप्रकारे वापर केला जातो.

अति शौकीन लोक सिंथेटीक अमली पदार्थ आणि आता घातक जीवघेणा एमडीचा (मेफेड्रॉन) वापर करतात. इतकेच नाही तर मॅजिक मश्रूम, एलसीडी, शिलावती, वेदनाशामक गोळ्या, व्हाईटनर यांचाही वापर ड्रग्स म्हणून केला जातो.या देशातून ड्रग्सचा सर्वाधिक पुरवठा होतो.शेजारील देशातून म्हणजेच पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, अफगाणिस्तान, भूतान इथून ड्रग्स आपल्या देशात येतात. याची किंमतही लाखो- करोडो रूपयात असते. याची खरेदी - विक्रीही सांकेतिक भाषेत म्हणजेच खुणांच्या माध्यमातून होते.हशीश'सारखे अंमली पदार्थ नेपाळमधून पुरवले जातात.

नायजेरियामधून भारतात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली जाते. नायजेरियन विद्यार्थी वा कपड्यांचे व्यापारी या माध्यमातून ही तस्करी केली जाते.ड्रग्स घेणाऱ्यांची लक्षणे कशी असतात पहा मुलांच्या वागण्यात अचानक बदल होतो.अभ्यासात, खेळ किंवा अन्य कार्यक्रमात त्याचे मन न लागणे,घरात इंजेक्शन अथवा सिरिंज आढळणे.डोळे लाल, निस्तेज होणे, डोळ्यांखाली सूज येणे ,बोलताना अडखळणे, उभे राहण्यासाठी त्रास होणे, भूक न लागणे, वजन कमी होणे.सामाजिक संघटन बदलणे.चिडचिड वाढणे.एकटे राहण्याची प्रवृत्ती. कुटुंब आणि सामाजिक संमेलन टाळणे व्यक्तिगत स्वच्छता, कपड्यांबद्दल बेफिकिरीने वागणे. निद्रानाश व्यसनाचा परिणाम फुप्फुस, स्मरणशक्ती, अवयव निकामी होणे.अस्वस्थता, मानसिक आजार होणे.

मुलांना ड्रग्स पासून कसे सुरक्षित ठेवाल पालकांनी आपल्या पाल्याला समजून घ्यावे. त्याच्याशी प्रेमाने वागा. त्यांना विश्वासात घ्या.काय वाईट..काय चांगले हे गोडीने व मित्रत्वाच्या नात्याने पटवून द्या. वाईट मित्रांची संगत करू देऊ नका. शिक्षकांचे हुशार मुलांबरोबर कमी मार्क्स असलेल्या मुलाकडेही तितकेच लक्ष हवे. कोणत्याही मुलाला कमी लेखू नका. मुलांवर वेळीच औषधोपचारमानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन घ्या.मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. ते आणखी सुंदर जगता येईल. कोणत्याही प्रकारचे व्यसन करून आयुष्य वाया घालवू नका. स्वतः तथागत गौतम बुद्धांनी आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवणार्या पंचशीलातील पाचव्या शिलात सांगितले आहे की.सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी अर्थ मी मद्य, त्याचप्रमाणे मोहात पडणार्या इत्तर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

संतोष मोरे ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज लोहारा

Updated : 13 Sep 2020 10:07 AM GMT
Next Story
Share it
Top