Home > विदर्भ > डोणगांव मध्ये कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे अभियान रॅली

डोणगांव मध्ये कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे अभियान रॅली

डोणगांव मध्ये कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे अभियान रॅली
X

फारुख शेख बुलडाणा

बुलढाणा जिल्ह्यातील डोणगांव येथील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडुन आरोग्य अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, जिल्हासह ग्रामीण भागात गेल्या पाच महिन्यापासुन कोरोना विषाणूच्या लढाईत शासन-प्रशासन सर्वोतपरी प्रर्यत्न करतानी दिसत आहेत.पण काही टंगेखोर आजही रसत्यावर मोकाट फिरतांना दिसत असल्याच्या कारणाने ,कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी घरातच थांबणे गरजेचे आहे.

कोरोना विषाणू संसर्गाची साखळी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरीही मेहकर तालुक्यामधील डोणगांव शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. त्यामुळे डोणगांव मध्ये आरोग्य विभागाचे वैधकीय अधिकारी डॉ अमोल गवई यांनी डोणगांव मध्ये कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य अभियान राबवण्यात येऊन गावातुन अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, या अभियान रॅली मध्ये जिल्हा परिषदचे कृषि सभापती राजेंद्र पळसकर,तर मेहकर पंचायत समिती सभापती निंबाजी पांडव सहभागी होते,व महिला सरपंच सौ उषा खोडके, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी,अंगणवाडी सेविका, मदतनिस,आशा सेविका,आरोग्य विभागाचे डोणगाव मधील सर्व कर्मचारी,आरोग्य सहायक शिवशंकर बळी सह डोणगांव वैधकीय अधिकारी डॉ अमोल गवई,हे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभाकडुन जनजागृती अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सोशल डिशस्टिंगच्या नियमाचे पालन करण्यात आले असता, रॅलीमध्ये विविध फरक जनजागृतीचे आकर्शक दिसत होते,तर आजाराची लक्षणे सांगताना सर्दी, खोकला, ताप, श्वसन प्रक्रियेत त्रास होत असेल तर त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करणे. तसेच हा आजार होऊ नये, म्हणून घ्यावयाची काळजी, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. गार पाणी, थंडपेय, आईसक्रीम तळलेले पदार्थ याचे सेवन करणे टाळावे, अर्धवट कच्चे शिजलेले अन्न खाऊ नये, प्राण्यांचा संपर्कात राहू नये, उघड्यावर थूंकू नये, बाहेरून आल्यावर अथवा शौचास जाऊन आल्यावर हात साबणाने धूणे, शिंक व खोकला आल्यावर तोंडावर रुमाल किंव्हा हात ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे.विनाकारण कुठेही बाहेर फिरु नये,शाररीक संपर्क टाळावा,तर व्यापारीवर्गानी दुकानात गर्दी न करता, ग्राहकांच्या तोंडावर माक्स बांधुन आल्यावरच वस्तु देऊन व्यापार करावा,तसेच सुरक्षित अंतर ठेऊनच राहावे,अशा अनेक आरोग्यसंदर्भात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी डोणगांव आरोग्य विभागाचे वैधकीय अधिकारी अमोल गवई यांनी माहिती दिली आहे.

Updated : 8 Sep 2020 10:27 AM GMT
Next Story
Share it
Top