टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांच्या मृत्यू प्रकरणात दोषीवर कारवाई करा.
X
असोसिएशन ऑफ डिजिटल मिडीया अँड इंडिपेंन्डट न्युज पोर्टलची मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन
यवतमाळ दि.०३ सप्टेंबर -: पुणे येथील ईलेक्ट्रॉनिक मिडियातील टीव्ही ९ मराठी चे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांना आरोग्य सुविधा न झाल्यास मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.दिनांक २८ ऑगस्ट रोजी त्यांनी त्यांची कोरोणा चाचणी करून घेतली होती.त्यांची कोरोणा चाचणी पॉझिटिव्ह आली व ३० ऑगस्ट रोजी रात्री पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना इतरत्र उपचारासाठी हलवण्याचे प्रयत्न सुरू होते.त्यातच त्यांची ऑक्सीजन पातळी ७८ पर्यंत खाली आली असतांना त्यांना इतरत्र हलविण्यासाठी कार्डिॲक अँब्युलन्सची आवश्यकता होती.जी अँब्युलन्स मिळाली त्याचे व्हेंटिलेटर खराब होते तर दुसऱ्या एका अँब्युलन्समध्ये डाॅक्टर उपलब्ध नव्हते.त्यामुळे आरोग्य विभागाच्या गोंधळ कारभारामुळे त्यांना वेळेवर काॅर्डिॲक ॲम्बुलन्स उपलब्ध न झाल्याने वेळेवर योग्य उपचार न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणात सखोल चौकशी करुन हलगर्जीपणा करणाऱ्यांवर व दोषी आढळणाऱ्या वर योग्य ती कारवाई करावी करण्यात यावी अशी मागणी असोसिएशन ऑफ डिजिटल मिडीया अँड इंडिपेंन्डट न्युज पोर्टलच्या वतीने करण्यात आली असुन निवेदन सादर करतांना जिल्हाध्यक्ष सुकांत प्रकाश वंजारी,कार्याध्यक्ष किशोर कुळसंगे,तालुका अध्यक्ष मकसुद अली सचिन भादीकर उपस्थित होते.