टिनाच्या घरात राहून समाजसेवा व रक्तदान करून हजारोंना जिवनदान देणार्या कमलेश या महान सेवकाचा आज जन्मदिवस
X
जाकीर हुसैन
यवतमालः फूथपाठ वर दिवस काढनारा कमलेश बघेल टिनाच्या घरात राहूनही केली समाज सेवा रक्त दान करून दिले हजारोंना जिवनदान आज या महान सेवकाचा जन्मदिवस कमलेश गजेंद्र बघेल हाच तो प्रतिसाद चा लाडका कमलेश ज्याला आईचा लाड मिळाला नाही वडीलांचा ही नाही पण कित्येक आईला आपली आई समजून दिले जिवनदान एक लिलाबाई मनोरुग्ण रस्त्यावर फिरत होती ती एकवीरा चौक येथे झोपून दिसली त्या लिलाबाई ला शासकीय रुग्णालय येथील बाथरूम मध्ये या कमलेश बघेल ने लेकराच्या मायेच्या हाताने अंघोळ करून दिली व शासकीय रुग्णालयात भरती केले डॉक्टर म्हनाले ही कोन आहे.
कमलेश म्हनाला ही माझी आई आहे उन्हाच्या चटक्याने भांबावून गेलेली ही आई रस्त्यावर फिरून आपले पोट भरनारी ही आई दवाखान्यात आनायला थोडा जरी वेळ झाला असता तर या आईने आपले प्राण गमावले असते अशी ही आई ज्याचची सेवा घडली कमलेश बघेल च्या हातून दवाखान्यात ऐडमीट केल्यावर या आईला उठता येत नव्हते त्या आईला दररोज हात धरून संडास व बाथरूम मध्ये नेनारा हा कमलेश दररोज आईला आपल्या हाताने घास मायेचा घास भरनारा हा कमलेश ही सेवा कमलेश ने शासकीय रुग्णालयात पंधरा दिवस सतत दररोज न चूकता केली व सूट्टी झाल्यावर या आईला दोलाराम महाराज व्रूद्धाश्रम येथे पोहचवले व तेथून पूढे मायेचा समागर शेशराव डोंगरे काका यांनी ही सेवा पूढे नेली व या आई तीन महीने जिवनदान दिले व तीन महीन्या नंतर एक दिवस या आईचा श्वास गेला डोंगरे काकांचा फोन आला कमलेश तूझी आई गेली रे कमलेश च्या डोळ्यात अश्रू धारा वाहील्या व त्या आईच्या मूलाचा पण शोध लागला त्याला घेऊन कमलेश व टिम प्रतीसाद त्या आईच्या अंतिम संस्कारासाठी उमरी पठार येथे पोहचले अंतीम संन्स्कार केले त्या आईचा तिसरा दिवस व तेरवीचा कार्यक्रम सापडलेल्या मूलाने सर्व व्रूद्धाश्रमातील व्रूद्धाना हाॅटेल मध्ये काम करून आपल्या हाताने भोजन दिले अस्या भरपूर आईंना या कमलेश ने दिले जिवनदान आज या महान प्रतिसाद फाऊंडेशन च्या समाज सेवकांचा आज जन्म दिवस एकदम ईमानदार हा कमलेश अशा शूरवीर कमलेश बघेल ला सर्व प्रतिसाद फाऊंडेशन टिम व म-मराठी न्युज नेटवर्क कडून जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा??????