Home > महाराष्ट्र राज्य > टपाल खाते देणार फाईव्ह स्टार सुविधाःशास्री....... परभणी जिल्ह्याची निवड

टपाल खाते देणार फाईव्ह स्टार सुविधाःशास्री....... परभणी जिल्ह्याची निवड

टपाल खाते देणार फाईव्ह स्टार सुविधाःशास्री....... परभणी जिल्ह्याची निवड
X

परभणी शांतीलाल शर्मा

परभणी डाक विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला टपाल

खात्याच्याजास्तीत जास्त बँकिंग सुविधा मिळाव्यात , ग्राहकांना आर्थिक लाभांच्या विविध योजनांचा फायदा मिळावा व नागरिकांना आर्थिक समावेशन योजनेमध्ये समाविष्ट करावे या हेतूने भारत सरकार फाईव्ह स्टार व्हीलेज हा अनोखा उपक्रम डाक विभागामार्फत राबवित आहे.

दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी या योजनेचा शुभारंभ केंद्रीय दूरसंचार व दळणवळण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फेर्सिंग द्वारे दुपारी ठीक तीन वाजता पार पडला. या पथदर्शी प्रकल्पासाठी सुरवातीच्या टप्प्यात परभणी डाक विभागांतर्गत येणाऱ्या परभणी आणि हिंगोली जिल्यातील प्रत्येकी पाच गावांची निवड करण्यातआली आहे. यामध्ये परभणी जिल्ह्या अंतर्गत पालम तालुक्यातील अंजनवाडी व हिंगोली जिल्ह्या अंतर्गत सेनगाव तालुक्यतील खैरी ही गावे निवडली आहेत.यावेळी पेठशिवणी या ठिकाणी डाक अधीक्षक एस.एन.शास्त्री, सहाय्यक डाक अधीक्षक .डी.आर.शिवणीकर, तंत्र सहाय्यक आर.डब्ल्यू. काळे, उप डाकपाल डी.एम. माने ,आणि शाखा डाकपाल .व्ही.एस.वाडेवाले हे व्हिडीओ कॉन्फेर्सिंगद्वारे झालेल्या समारोहाच्या ठिकाणी उपस्थित होते.तसेच हत्ता सेनगाव या ठिकाणी विभागीय डाक निरीक्षक एस.एन.कडतन, उप डाकपाल.आर. डी.बगाटे, तंत्र सहाय्यक .यु.बी.कोरडे तसेंच शाखा डाकपाल,एन.एस.क्षीरसागर हे उपस्थित होते. सदर प्रसंगी परभणी डाक विभागाचे अधीक्षक एस.एन. शास्त्री यांच्या वतीने परभणी डाक विभागातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी डाक विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.असे आवाहन केले,

Updated : 10 Sep 2020 2:25 PM GMT
Next Story
Share it
Top