Home > विदर्भ > झुल्लर येथे पशुचे लसीकरण शिबिर

झुल्लर येथे पशुचे लसीकरण शिबिर

झुल्लर येथे पशुचे लसीकरण शिबिर
X

राळेगांव तालुका प्रतिनिधी :---

राळेगाव तालुक्यातील झुल्लर येते दि.२२-०८-२०२० ला

पशुधन विकास अधिकारी डॉ.बद्रीनाथ आमने यांच्या उपस्थितीत डी २२ ऑगष्ट २०२० रोज शनिवारला पशु लसीकरण शिबिर घेण्यात आले. या लसीकरण शिबिराला गावातील प्रमुख गावकरी बंडूजी टालवटकर ,विलास वानखडे,बबन फुन्ने उपस्थित होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आंतर्गत,सी. एस. एम. एस. एस कृषि महाविद्यालय कांचनवाडी औरंगाबाद,पदवी शिक्षण अंतिम वर्ष ७ व्या सत्राचा विद्यार्थि शिवम विलास वानखडे यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत सहभाग घेतला व महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. डी. के.शेळके, इन्चार्ज प्रनिता मुळे,डाँ.सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने गावकऱ्यांना पशु लसीकरणाचे महत्व पटवून दिले व लसीकरणाच्या दरम्यान कोरोनाचा नियमांचे काटेकोर पणे पालन करण्यात आले असून या शिबिरात गावातील पशुचे लसीकरण व तपासणी करण्यात आली आहे.

Updated : 8 Sep 2020 10:43 AM GMT
Next Story
Share it
Top