Home > महाराष्ट्र राज्य > झरी नगरपंचायतीमध्ये 'जामणी ग्रामपंचायत' सामावून घ्या, नाहीतर आमरण उपोषणाचा स्तानिकांच ईशारा

झरी नगरपंचायतीमध्ये 'जामणी ग्रामपंचायत' सामावून घ्या, नाहीतर आमरण उपोषणाचा स्तानिकांच ईशारा

झरी नगरपंचायतीमध्ये जामणी ग्रामपंचायत सामावून घ्या, नाहीतर आमरण उपोषणाचा स्तानिकांच ईशारा
X

झरी नगरपंचायतीमध्ये 'जामणी ग्रामपंचायत' सामावून घ्या, नाहीतर आमरण उपोषणाचा स्तानिकांच ईशारा....""

स्थानिक नागरिकांची नागपूर खंडपिठापर्यंत धाव..."""

म मराठी न्यूज टीम.

प्रतिनिधी/पुरुषोत्तम गेडाम

यवतमाळ / झरी जामणी :- झरी जामणीला पाच वर्षांपूर्वी नगरपंचायातीचा दर्जा मिळाला आहे. परंतु झरीला लागूनच असलेल्या जामनी गावाला नगरपंचायत मध्ये समाविष्ट न केल्याने नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे झरी नगरपंचायतीमध्ये जामणी ग्रामपंचायत समाविष्ठ करा या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी अतोनात प्रयत्न केले आहे.

जामनी गाव नगरपंचायत मध्ये समाविष्ट करण्यात याकरिता वरिष्ठ पर्यंत सतत पाठपुरावा करीत आहे.

पाच वर्षपूर्वी जामणी, शिरोला व झरी असे तीन प्रभाग मिळून नगरपंचायत अस्थितवात येणार होती पण ते झाले नाही.

जामणी ग्रामपंचायत नगरपंचायत मध्ये समावेश होण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. कमी लोकवस्ती असलेला व नगरपंचायतला लागून असलेल्या गावाला समाविष्ट करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. झरी व शिरोला गाव मिळून १७ वॉर्ड आहे. झरी व शिरोला गावातील बहुतांश वॉर्डातील सिमेंट रस्ते तयार करण्यात आले आहे परंतु जामनीत जाणाऱ्या व अंतर्गत रस्त्याची दुर्दशा झाली आहे. अशी तक्रार स्थानिक रहिवाशांची आहे.

झरी, शिरोला व जामनी हे एकदम कमी लोकसंख्येचे गाव आहे. झरी नगरपंचायत आदिवासी बहुल तालुक्यातील असल्याने शासनाचा निधी विकास कामाकरिता मोठ्या प्रमाणात येतो ज्यामुळे विकासकामे सुद्धा मोठ्या प्रमाणात करता येते. जामनी गाव नगरपंचायत मध्ये समाविष्ट नसल्याने मोठ्या प्रमाणात होणारे विकासकामे संथ गतीने होत आहे. आता जामनी ग्रामपंचायत नगरपंचायत मध्ये समाविष्ट झालीच पाहिजे असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. जर येत्या नगर पंचायत निवडणूकाचे वेळी जामणी ग्राम पंचायत समाविष्ट न केल्यास नगर पंचायत क्या सोमोर आमरण उपोषणाला बसणार असा ईशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.

प्रतिनिधी :-

पुरुषोत्तम गेडाम,

मो.9763808163

Updated : 4 Nov 2020 1:37 PM GMT
Next Story
Share it
Top