जुगार अड्डयावर अचलपूर पोलिसांची धाड
X
अचलपूर तालुका प्रतिनिधी/उषा पानसरे
अचलपूर -: पोलिस स्टेशन अचलपूर चे ठाणेदार सेवानंद वानखडे व त्यांच्या पथकाने अल-करीम काँलनी मध्ये घरामध्ये चालणार्या जूगार अड्यावर धाड टाकून एकूण 6 आरोपीसह रू.५५१७५ / चा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र जुगार कायद्याचे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला..
आज रोजी अल करिम काँलनी मध्ये १)सै.महेमुद अली.सै.मुकदर अली यांच्या राहत्या घरी तो स्वतः व त्यांच्या सोबत २)गणेश पांडुरंग नागले वय-५३ रा.विलायतपुरा ३)शेख मकसूद शेख मोहमद वय -३२ रा.कासदपुरा अचलपूर,४)शेख नजीर शेख चाँद वय -३४ रा विलायतपुरा,अचलपुर ५)शहेदा शेख बशीर वय-५४ रा.बियाबानी अचलपूर.६)मोहमद आरीफ मोहमद शरीफ,वय-३४ रा.दुल्हागेट,अचलपूर.यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून जूगार साहित्य
१) जुगारातील नगदी रू. ९७००/
२)जुगारातील ५२ ताशपत्ते (७१)सेट रु.१७७५/
३)मोटार सायकल रु.२७०००/
४) जुगारातील साहीत्य रु.२५००/
५)चार मोबाईल रु.१४२००/
एकुण मुद्देमाल जमा करण्यात आला.रु.५५१७५/- सदरची कारवाई मा पोलिस अधिक्षक डाॅ हरीबालाजी एन साहेब ,अप्पर पोलिस अधीक्षक श्री श्याम घुगे साहेब व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.अब्दागिरे,साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. अचलपूरचे ठाणेदार श्री.सेवानंद वानखडे,डी. बी प्रमुख पो उप नि.राजेश भालेराव,पो उप नि शेख मतीन,पो उप नि सोनोने,पो हे काँ सिध्दार्थ वानखडे, नापोका नरेंद्र मुळतकार,पो काँ विशाल थोरात,महीला पो काँ रेश्मा कदम, यांनी केलेला पुढील तपास पो उपनि सोनोने करीत आहे.